नेवासा पोलिसांतर्फे एकता दौड

नेवासा फाटा – नेवासा पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय एकता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या दौडमध्ये ज्ञानोदय इंग्लिश स्कूल व सुंदरबाई कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

यावेळी पोलीस निरीक्षक रणजित डेरे, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, डॉ.भाऊसाहेब घुले, बाळासाहेब पवार, गफूरभाई बागवान, अंबादास ईरले, ज्ञानोदयचे मुख्याध्यापक पंडितराव खाटीक, सुंदरबाई कन्या विद्यालयाच्या प्राचार्या रंजनाताई देशमुख, सामाजिक कार्यकर्ते जालिंदर गवळी, गोपनीय शाखेचे बाळासाहेब घुगरकर, विठ्ठलराव गायकवाड, बाळासाहेब नागरगोजे, भीम पवार, इस्माईल जहागीरदार, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष सुधीर चव्हाण उपस्थित होते. यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती व स्वर्गीय इंदिराजी गांधी पुण्यतिथी निमित्त अभिवादन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डेरे म्हणाले, राष्ट्रीय एकता कायम रहावी बंधुभाव देशात नांदावा म्हणून पोलीस दलाच्या वतीने एकता दौडचे आयोजन करण्यात आले.राष्ट्रीय एकता व अखंडता मजबूत करा, असे त्यांनी आवाहन केले. सुनील धस यांनी सूत्रसंचालन केले तर प्राचार्या रंजनाताई देशमुख यांनी आभार मानले. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रीय एकता दौडला प्रारंभ करण्यात आला. राष्ट्रीय एकता दौडमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)