विद्यार्थ्यानी घेतली फटाके मुक्तीची शपथ

नगर – दिवाळी म्हटली की, फटाके हे प्रमुख आकर्षण असते. याला फाटा देत लहान मुलांकरीता फटाकेमुक्त दिवाळी हा उपक्रम सातत्याने, गेली 5 वर्षापासून आम्ही राबवत आहोत, यात विद्यार्थ्यांसह पालकही मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. पालकांकडे फटाके आणू नका असा आग्रह मुले धरतात, अशी माहिती मुख्याध्यापक सुरेश शेवाळे यांनी दिली.

लालटाकी रोडवरील महाराष्ट्र बालक मंदिर शाळेत फटाकेमुक्त दिवाळी यांची शपथ घेण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक सुरेश शेवाळे, व्याख्याते विठ्ठल बुलबुले आदिंसह शिक्षक उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुख्याध्यापक सुरेश शेवाळे म्हणाले, भारतीय पंरपरेतील सर्व सण, उत्सवांत नेहमीच आम्ही सहभागी होतो. फटाक्‍याचा पैशाचा उपयोग गोरगरिब, अनाथ गरजूंना देण्यात येतो. नागरिकांना निरोगी व प्रदुषणमुक्त वातावरणात जगण्यासाठी पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. फटाके न उडवण्याची शपथ विठ्‌ठल बुलबुले यांनी दिली. सूत्रसंचालन दीपक इरोळे यांनी केले. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)