“हाउसफुल 4’मध्ये नाना पाटेकर बनला गझल गायक 

कोरियोग्राफर आणि चित्रपट निर्माता फराह खान हिने काही दिवसांपूर्वीच आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. ज्यात नाना पाटेकर, कृति सेनन आणि पूजा हेगडेसह चित्रपटातील कलाकार आणि टीम मेंबर्स होते. हा चित्रपटात फूल टू कॉमेडी असणार आहे. मात्र, नानाच्या भूमिकेबाबत संसपेन्स ठेवण्यात आला होता. 

आता “हाउसफुल 4’मधील नानाच्या भूमिकेवरील पडदा उठला असून तो एका गझल गायकाची भूमिका साकारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आणि गत आठवडयातच त्याने त्याच्या हिस्साचे शूटिंग पूर्ण केले आहे. नानाची हे किरदार खूपच दिलचस्प असून त्याला विविध छटा आहेत. “हाउसफुल 4’चे शैड्यूल पूर्ण करून नाना नुकताच मुंबईला परतला आहे. 

-Ads-

दरम्यान, “हाउसफुल 4’मध्यक अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, कृति खरबंदा आणि चंकी पांडे आदी कलाकारही झळकणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन साजिद खान यांनी केले आहे. यापूर्वी “हाउसफुल’ आणि “हाउसफुल 2’चे दिग्दर्शनही त्यांनीच केले होते. 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)