नाना पाटेकर करणार तेलगू इंडस्ट्रीत पदार्पण

“मी टू’ मोहिमेंतर्गत अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. हे सर्व आरोप नाना पाटेकर यांनी फेटाळून लावल्यानंतरही नानांसोबत काम करण्यास “हाऊसफुल’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी नकार दिला होता. या आरोपांनंतर अद्याप नाना हिंदी चित्रपटात दिसले नाहीत. पण ते लवकरच तेलगू इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे.

तेलगू चित्रपटात नाना पाटेकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. नाना दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन यांच्या “नन्ना नेनू’ या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे. ही भूमिका महत्त्वाची असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक नाना पाटेकर यांच्या संपर्कात असून, या भूमिकेसाठी त्यांना लवकरच निश्‍चित करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या चित्रपटासाठी नव्या चेहऱ्याच्या शोधात दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास होते. नाना पाटेकर या भूमिकेसाठी योग्य आहेत, असे श्रीनिवास यांना वाटते. सध्या नाना पाटेकर यांच्यासोबत या चित्रपटासंदर्भात बोलणी सुरू असून अद्याप या चित्रपटाचे कथानक गुलदस्त्यात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)