नाना पाटेकरांनी रद्द केली पत्रकार परिषद 

तनुश्री दत्ताला देणार होते उत्तर 
वकिलांनी मनाई केल्याचे दिले कारण 
मुंबई: नाना पाटेकर यांनी आपला लैंगिक छळ केल्याचा आरोप करणाऱ्या अभिनेत्री तनुश्री दत्ता हिला उत्तर देण्यासाठी अभिनेते नाना पाटेकर यांनी आज आयोजित केलेली पत्रकार परिषद त्यांनी रद्द केली आहे. काल रात्रीच त्यांचे चिरंजीव मल्हार यांनी पत्रकार परिषद रद्द झाल्याची माहिती देणारा संदेश सर्व पत्रकारांना पाठवला होता.
उद्या होणारी पत्रकार परिषद रद्द करण्यात आली असून या संबंधातील पुढील माहिती लवकरच तुम्हाला देण्यात येईल असे मल्हार पाटेकर यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. या संबंधात नाना पाटेकर यांनी आपल्या वकिलामार्फत तनुश्री दत्ता हिला नोटीस पाठवली आहे. सन 2008 साली घडलेल्या या घटनेबद्दल तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यासह नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, आणि चित्रपटाच्या निर्माता दिग्दर्शकाच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे.
नाना पाटेकर सध्या हाऊस फुल 4 या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असून ते शनिवारी जोधपुरहून मुंबईत परतले आहेत. या विषयावर आपण दहा वर्षांपुर्वीच बोललो होतो. जे खोटं आहे ते खोटच आहे असे त्यांनी म्हटले आहे. या विषयी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी आणखी काहीही बोलण्याचे टाळले आहे. दरम्यान आपल्या वकिलांनी आपल्याला मिडीयाशी बोलायला अनुमती नाकारली आहे असे त्यांनी म्हटले असल्याचे वृत्त एका वाहिनीने दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)