“मी टू’ प्रकरणानंतर नानाचे कमबॅक

तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर नानाने “हाऊसफुल्ल 4’मधून माघार घेतली होती. मात्र गेले काही महिने नानाच्या मागे “मी टू’चे शुक्‍लकाष्ट लागले होते. आता त्या प्रकरणाची धार कमी झाली असल्यामुळे नानाने “कमबॅक’ करण्याचा निर्णय घेतला आहे. “वेलकम 3′ आणि “वेलकम 4’या एका पाठोपाठ एक दोन सिनेमंमधून नाना रुपेरी पडद्यावर वापसी करणार आहे.

या दोन्ही सिनेमांचे शुटिंग लवकरच सुरु होणार आहे. यामध्ये नानाच्या बरोबर जॉन अब्राहम आणि परेश रावळ देखील असणार आहेत. “वेलकम’ सिरीजचा तिसरा भाग 2020 मध्ये तर चौथा भाग 2021 साली रिलीज होणार आहे. या दोन्ही सिनेमांमध्ये ऍक्‍शन आणि कॉमेडीचा तडका असला, तरी सगळा भर ऍक्‍शनवरच असणार आहे.

“वेलकम’ आणि “वेलकम बॅक’मध्ये नानाने भन्नाट कॉमेडी केली होती. तनुश्री दत्ताने नानावर केलेल्या “मी टू’च्या आरोपांमुळे नाना थोडा अस्वस्थ झाला असणार. थोडा काळ बॉलिवूडपासून दूरावलाही होता. आता या दोन्ही सिनेमांनंतर नानाबाबतची कटुता निश्‍चितच कमी होईल.

Ads

1 COMMENT

  1. आता तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर नानाने माघार घेतली होती. तनुश्री अमेरिकेला गेली असल्या मुळे नाना खुश आहे. पैशाची चणचण भासत आहे त्यामुळे हा निर्णय घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)