भारतीय युवकांना संधी : “आयुका’चे आवाहन, खगोलशास्त्राबद्दल रूची वाढवण्यासाठी उपक्रम
स्पर्धेत सहभागासाठी वयोमर्यादा
शालेय म्हणजेच 10 ते 18 वयोगटातील विद्यार्थी ग्रहाचे नाव सुचवू शकतात. तसेच महाविद्यालयीन म्हणजे 18 ते 22 वयोगटातील विद्यार्थी ताऱ्यांचे नाव सुचवू शकतात.लघुलिंक
http://bit.ly/newindiaमुख्यलिंक
पुणे – सूर्यमालेच्या बाहेरील ग्रह आणि ताऱ्याला नाव देण्याची संधी “आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघटना (आयएयू) यांनी दिली आहे. ही नामकरणाची संधी शालेय विद्यार्थी आणि युवकांसाठी असून, दि.15 ऑगस्ट पर्यंत ती कळवणे अपेक्षित आहे.
“आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघटना’ हा अवकाशातील ग्रह ताऱ्यांना अधिकृत नाव देणारी संस्था आहे. यावर्षी 2019 मध्ये या संस्थेच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने लोकांमध्ये खगोलशास्त्राबद्दल अधिक रुची वाढवण्यासाठी संघटनेने जगभरात अनेक कर्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यापैकीच “आयएयू नेमएक्झोवर्ल्डस’ (खअण छराशएुेथीेश्रवी) हा एक उपक्रम आहे.
या प्रकल्पांतर्गत आजपर्यंत संघटनांनी प्रत्येक देशाला सूर्यमालेच्या बाहेरील एक तारा आणि त्याच्या भोवती परिभ्रमण करणारा ग्रह यांचे नामकरण करण्याची संधी दिली आहे. प्रत्येक देशाला ठरवून दिलेला तारा या देशातून पाहता येईल असाच निवडण्यात आला आहे. तसेच तुलनेने कमी व्यासाच्या दुर्बिणीतून त्याचे निरीक्षण करता येईल असेही त्यामागचे गणित आहे. सन 2015 मध्ये असाच उपक्रम घेण्यात आला होता. त्यावेळी सूर्यमालेच्या बाहेरील 19 ग्रहमालिकांतील 31 ग्रहांचे नामकरण करण्यात आले होते. त्यानंतर अशाप्रकारची ही पहिलीच युवकांच्या सहभागातून केलेली मोहीम आहे.
बऱ्याच सखोल अभ्यासानंतर या संघटनेच्या संबंधित एका समितीने भारताला सूर्यमालेबाहेरील ग्रह आणि तारे यांचे नामकरण करण्याची संधी दिली आहे. ही ग्रहमालिका “कऊ 86081′ या ताऱ्याभोवती फिरत असून 340 प्रकाशवर्षे दूर आहे. “कऊ 86081′ हा त्या मालिकेतील एकाकी ग्रह असून तो गुरू ग्रहाचा आकार आणि वस्तुमान असल्यासारखा दिसतो. हा तारा “षडांश’ (डशुींरपी) नक्षत्रात संपूर्ण भारतात दिसतो.
या अभियानाची व्यापकता वाढवण्यासाठी आणि त्यातील पारदर्शकता निर्धारित करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. संघटनेने ठरवलेल्या नियमानुसारच ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.
स्पर्धेचा कालावधी
या स्पर्धेची सुरुवात दि.10 जुलै रोजी झाली आहे. दि.15 ऑगस्टपर्यंत नाव सुचवता येणार आहे. त्यानंतर निवडक अशा ग्रह आणि तारे यांच्या नावावर 1 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या काळात मतदान घेतले जाणार आहे. त्यानंतर डिसेंबर 2019 मध्ये अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. भारतीय विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध असून, भारतीय भाषांमधील नावेही या नामकरणासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.