‘कावेरी’वरून गदारोळ; राज्यसभेचे आजचे कामकाज तहकूब

नवी दिल्ली : राज्यसभा अध्यक्ष एम व्यंकैय्या नायडू यांनी आज राज्यसभेचे आजच्या दिवसाचे काम एआयडीएमके आणि डीएमके या पक्षाच्या सदस्यांनी राज्यसभेमध्ये घातलेल्या गदारोळामुळे तहकूब केले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, एआयडीएमके व डीएमके पक्षाच्या सदस्यांनी आज राज्यसभेमध्ये कावेरी नदीच्या पाणीवाटपावरून जोरदार गोंधळ घातला. आजच्या दिवसाचे कामकाज सुरु झाल्यापासूनच या सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनापुढील जागेमध्ये उभे राहून जोरदार निदर्शने केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुपारपर्यंत सदस्यांनी घातलेल्या गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले. शेवटी ३ वाजता कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर सदस्यांनी पुन्हा एकदा निदर्शने करण्यास सुरुवात केली. कामकाजामध्ये सदस्यांच्या गोंधळामुळे सतत अडचणी येत असल्याने राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकैय्या नायडू यांनी सभागृहाचे आजचे कामकाज तहकूब करण्याचा निर्णय घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)