जगदंबा माता नवरात्रोत्सवाचे शिरसगाव येथे आयोजन

गोपाळपूर – नेवासे तालुक्‍यातील शिरसगाव येथे बुधवार (दि.10) पासून जगदंबा माता नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सद्‌गुरु किसनगिरी बाबा, वै. बन्सी महाराज तांबे, भास्करगिरी महाराज यांच्या प्रेरणेने व शिवाजी महाराज देशमुख, राजेंद्र महाराज आसणे, सुभाष महाराज देशमुख, प्रल्हाद महाराज कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे अखंड हरीनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्र उत्सवाचे हे 36 वे वर्ष त्रितपपूर्ती सोहळा म्हणून साजरे होत आहे.

बुधवारी सकाळी आ. बाळासाहेब मुरकुटे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते कलश पूजन व ग्रंथपूजन होणार आहे. सप्ताह काळात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पहाटे 4 ते 6 काकडा भजन, आरती, सकाळी 7 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 3 ते 5 या वेळेत अशोक महाराज बोरुडे यांच्या वाणीतून भावार्थ रामायण, सायंकाळी 5 ते 7 हरिपाठ व संध्याकाळी 9 ते 11 या वेळेत महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकारांचे किर्तन आयोजित केले आहे.

-Ads-

यामध्ये बुधवारी रामकृष्ण महाराज नाबदे, गुरुवारी प्रकाश महाराज जंजीरे, शुक्रवारी ज्ञानेश्वर महाराज शिंदे, शनिवारी अक्रुर महाराज साखरे, रविवारी तुकाराम महाराज बोडके, सोमवारी विनोदाचार्य सुधाकर महाराज वाघ, मंगळवारी सुभाष महाराज सुर्यवंशी, बुधवारी कृष्णाजी महाराज नवले यांची किर्तने होणार आहेत. गुरुवारी सकाळी 9 ते 11 यावेळेत शिवाजी महाराज देशमुख यांच्या काल्याच्या किर्तनाने सोहळ्याची सांगता होणार आहे. सप्ताह काळामध्ये देवगड संस्थानचे मठाधिपती भास्करगिरी महाराज, माजी आमदार शंकरराव गडाख, माजी आमदार नरेंद्र घुले हे सदिच्छा भेट देणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup: Thumbs up
10 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)