नागपुरात जमावाकडून कुख्यात गुंडाची हत्या

नागपूर – मुख्यमंत्र्यांचे होमटाऊन असलेल्या नागपुरात गुन्हेगारी घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. नववर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान वेगवेगळ्या घटनेत नागपुरात एका गुंडासह अन्य एकाची हत्या झाली आहे. या घटनांमुळे नागपूरमध्ये नववर्षाच्या उत्साहाला गालबोट लागले आहे.

पहिली घटना एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत राजीवनगरमध्ये घडली. या परिसरातील कुख्यात गुंड रणजीत लडी याला आणि त्याच्या एका साथीदाराला परिसरातील लोकांनी जबर मारहाण केली. यात रणजीत लडीचा मृत्यू झाला असून त्याचा सहकारी गंभीर जखमी आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे दोघेही परिसरातील सामान्य लोकांची लुटमार, दमदाटी करायचे. त्रासलेल्या लोकांनी गुंडांचा स्वतः बंदोबस्त केला. ही घटना रात्री 12 च्या सुमारास घडली.

दुसरी घटना इमामवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत जाटतरोडीमध्ये घडली. आकाश वाघमारे या तरुणाची तीन ते चार लोकांनी हत्या केली. ही हत्या देखील सेलिब्रेशन दरम्यान झालेल्या वादातून करण्यात आल्याचे समजते. या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या दोन्ही घटनांमुळे नागपूरमधील उत्साहाला गालबोट लागले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)