नगरकर बोलू लागले…दहा-बारा दिवसांनी येते पाणी

पथदिव्यांचा प्रश्‍न गंभीर

पटवर्धन चौक परिसरामध्ये दिवसभर मोठी रहदारी असते. या प्रभागामध्ये रस्त्यांची कामे होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पथदिव्यांची कमतरता आहे. तसेच बंदिस्त गटारींची कामे होणे गरजेचे आहे. या परिसरातील गटारीतून सांडपाणी बाहेर येत रस्त्यावरून वाहते, त्यामुळे दुर्गंधी वाढीला पूरक वातावरण तयार होते. तसेच रोगराईला आमंत्रण मिळते, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
– सागर शिंदे, गौरी घुमट

 

10-12 दिवसांनी येते पाणी

शिवाजीनगर परिसरातील रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत, परिसरात 10-12 दिवसांनी पाणी पुरवठा केला जातो, अनेकदा हे पाणी दूषीत पाणी येते.पाण्याची पाईप लाईन करत असताना प्रभागातील ड्रेनेज लाईन फुटल्या होत्या. मात्र त्यानंतर त्या दुरूस्त करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे दुर्गंधी पसरली जाते. महापालिकेकडून मुलभूत सुविधा मिळत नाही. अंतर्गत रस्त्यांची आजवर कामेच झाली नाहीत.
– रवि जाधव, शिवाजीनगर, कल्याण रोड

 

तीन-चार महिन्यात कामे झाली

माळीवाडा परिसरामध्ये मागील काही वर्षांमध्ये रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय अशी होती. मात्र महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तीन- चार महिण्यांच्या कालावधीमध्ये रस्त्यांची कामे झाली आहेत. तसेच प्रभागामध्ये ड्रेनेजची काही प्रमाणात कामे झाली. पथदिव्यांची कामे झालेली आहेत. मात्र मागील काही महिण्यांपुर्वी ही कामे झाली आहेत.
– सत्यम नामदे, माळीवाडा

 

उद्याने उभारणे गरजेचे

मागील महापालिकेच्या निवडणूका झाल्यापासून अयोध्यानगर परिसरामध्ये ड्रेनेजची कामे झालेली नव्हती. काही वर्षांपासून या भागामध्ये ड्रेनेजच्या सांडपाण्याचा प्रश्‍न होता. मात्र काही महिण्यांपूर्वी काही प्रमाणात हे प्रश्‍न सोडविले आहेत. रस्त्यांची कामे झाली आहेत, ती आता निवडणूका जवळ आल्यानंतर यापूर्वी समस्यांकडे डोळेझाक होत असे, मात्र आता सुविधा मिळण्यास सुरूवात झाली आहे. तसेच परिसरामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यान होणे गरजेचे आहे.
– पियुष कांबळे, अयोध्यानगर

 

प्रभागात मूलभूत सुविधा उपलब्ध

पूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी प्रभागात उद्यानाची सुविधा, ज्येष्ठ नागरिकांसाठी हास्य क्‍लब, लहान मुलांना व तरुणांना व्यायामाचे महत्व पटण्यासाठी व्यायाम शाळा, विविध मोफत सर्वरोग निदान शिबिरे, सर्वांना कमी खर्चात आवश्‍यक सुविधा, रस्ते, वीज व्यवस्था, हायमास्ट दिवे तसेच प्रभागातील जुन्या ओढ्याची दुरुस्ती, कचऱ्याचे संकलन आदी महत्वपूर्ण सुविधा केल्या.
– महेश बाचल, सिव्हील हडको.

 

फेज टूची पाइपलाईन होणे गरजेचे

पूर्वीच्या लोकप्रतिनिधींचे प्रभागातील पाण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष झाले आहे. सध्याची पाइपलाइन ही वीस तीस वर्षांपूर्वीची जुनी असून त्यामध्ये झाडांची मुळे आलेली आहे. तसेच त्या गंजलेल्या असून दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. शिवाय पिण्याचे पाणी ही नियमित येत नसून दोन तीन दिवसाआड मिळते. त्यातही नळाला विद्युत मोटार लावली गेल्यास पाणी कमी प्रमाणात मिळते. सध्या फेज 2 ची पाइपलाइन टाकली असून पुढील कामाबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. तरी नवनिर्वाचित नगरसेवकाकडून पाइपलाइनचे अपूर्ण काम पूर्ण करुन प्रभागातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी नियमित मिळावे एवढीच माफक अपेक्षा.
– महेंद्र तिवारी, सिव्हील हडको.

 

प्रभागात दर्जेदार कामांचा अभाव

लोकप्रतिनिधींकडून प्रभागात रस्ता डांबरीकरण, साफसफाई, कचरा संकलन, आरोग्य शिबिरे, मंदिर सुशोभिकरण अशी एकाच प्रकारची कामे वारंवार केली जात आहेत. त्यातही त्यांच्या कामात सातत्य असल्याचे दिसत नाही. परिणामी इतर आवश्‍यक कामांकडे दुर्लक्ष होते. नवनिर्वाचित नगरसेवकांकडून नवीन स्वरुपाची, दर्जेदार कामे होणे गरजेचे आहे.
– अमित बोचुघोळ, नालेगाव

 

शहरातील उड्डाणपूल व्हावा

पूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी बालिकाश्रम रोड, कोठी रोड ते आनंदऋषी हॉस्पिटल आदी भागांची रस्त्याची कामे चांगली केली. पूर्वी लोकप्रतिनिधींनी दिलेली उड्डाणपुलाच्या कामाबाबतची आश्‍वासने नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी पूर्ण करावी. कोणतेही पक्षीय राजकारण बाजूला ठेवून उड्डाणपुलासाठी संघटितपणे प्रयत्न करावे. तसेच वाहतूक प्रश्‍न, अतिक्रमणाकडे लक्ष द्यावे.
– डॉ. अनिरुध्द गिते, बालरोगतज्ज्ञ


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)