नगरकर बोलू लागले…रस्त्यांचा प्रश्‍न मोठा गंभीर 

मोकाट जनावरांना आळा घालावा 

परिसरामध्ये रस्त्याची कामे झालेली आहेत. त्याचबरोबर पाणी पुरवठा वेळेवर होतो. रस्तेदेखील या भागामध्ये सुस्थितीत आहेत. परिसरामध्ये केवळ मोकाट जनावरांचा काही प्रमाणात वावर दिसून येतो, त्याकडे पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. ही मोकाट जनावरे रस्तयावर तसेच बाजूला थांबलेली असतात, त्यामुळे वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.

आनंद कुकरेजा, तारकपूर 


रस्त्यांचा प्रश्‍न मोठा गंभीर

 ढवण वस्ती परिसरामध्ये पाण्याची सुविधा झालेली आहे. मात्र रस्त्याने चालताना अत्यंत असुविधेचा सामना करावा लागतो. या भागामध्ये रस्ते झाले नाहीत. काही ठिकाणी रस्त्यांची कामे झाली मात्र अनेक ठिकाणचे रस्ते मात्र अद्यापही झालेली नाहीत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना या भागातून ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करण्याची वेळ येते. रस्ते नसल्यामुळे परिसरातील नागरिकांना दळणवळणासाठी वाहने येत नाहीत. या परिसरामध्ये सांडपाण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे.

– तेजस पवळ, ढवण वस्ती 


मोकळ्या जागी वृक्षारोपन करावे 

या परिसरामध्ये पाणी वेळेवर येते. रस्त्यांची कामे चांगल्या पद्धतीने झालेली आहेत. मात्र या परिसरामध्ये मोकळ्या जागेमध्ये वृक्षारोपन केल्यास त्या जागेचा उपयोग करता येऊ शकतो. तसेच परिसरामध्ये मूलभूत सुविधा तर मिळत आहेत. आता यापुढे शहर सुशोभिकरणाकडे लक्ष देण्याची गरज आहे. परिसरातील गणेशमंडळांना हाताशी धरून गल्ली तसेच प्रभाग सुशोभीकरण केल्यास त्याचा मोठा फायदा होऊ शकतो.

– ऍड. पुष्कर तांबे, माळीवाडा 


कचरा कुंडीतील कचरा तत्काळ उचलावा 

या परिसरामध्ये रस्त्यांची कामे झालेली आहेत, मात्र अनेक ठिकाणी रस्त्यांना खड्डे पडलेली आहेत. परिसरामध्ये पाणी वेळेवर येते, मात्र कचरा कुंडीतील कचरा बहुदा तत्काळ उचलला जात नाही. त्यामुळे कुंडीतील कचरा हा रस्त्यावर विखूरला जातो. त्याचबरोबर यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरण्याचे प्रकारदेखील घडतात. तसेच या परिसरातील रस्त्याच्या बाजूला वाढलेली काटेरी झुडपे बाजूला करण्याची गरज आहे.

– दीपक दांडगे, सिव्हिल हडको 


मोकळ्या जागेत गार्डन व्हावे

 

या प्रभागात रस्त्यांची दुरुस्ती होणे आवश्‍यक आहे. विजेचा लपंडाव असतो. परिसरात अनेक वर्षापासून मोकळ्या असलेल्या जागेत गार्डन व्हावे. कचरागाडी वेळेवर येते. परिसरात रस्त्याच्या कडेला कचराकुंड्या बसविणे आवश्‍यक आहे. पोलिसांची नियमित गस्त असल्याने चोऱ्याचे प्रमाण नगण्य आहे. पथदिवे सुस्थितीत आहेत. पिण्याची पाण्याची सुविधा आहे.

हरिप्रसाद गार्डे, गायकवाड मळा, सावेडी


परिसरात कचराकुंड्याची आवश्‍यकता

या प्रभागातील रस्ते दुरुस्त आहेत. पथदिव्यांचे काम चालू आहे. परिसरात कचराकुंड्याची आवश्‍यकता आहे. मुलांना खेळण्यासाठी गार्डन उपलब्ध आहे. पाण्याची व्यवस्थाही चांगली आहे. या भागात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवणे आवश्‍यक आहे. या भागातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वाचनालय आवश्‍यक आहे.

सचिन पेहरकर, बालीकाश्रम रोड.


 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)