नगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा

नगरकरांना मुलभूत सुविधा मिळाव्यात

महापालिकेने अधिक महत्वकांक्षी योजना राबविण्यापेक्षा नागरिकांच्या मूलभुत गरजा भागविण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. ज्या विद्यार्थ्यांना पुणे-मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन अभ्यास करता येणे शक्‍य नाही, त्यासाठी नगरमधील स्पर्धापरीक्षा केंद्र सुरू करावेत. महापालिकेची सर्वसाधारण सभा ही काही कुस्तीचा आखाडा नाही. तो लोकशाहीचा मंच आहे. तेथे प्रत्येकाचे मत मांडण्याचा अधिकार आहे.

– डॉ. सुनील कवडे, नगर


नगरमध्ये नोकरीच्या संधी मिळाव्यात

नगरचे तरूण नगर सोडून बाहेर नोकरीला का जातात, हा सर्वात मोठा प्रश्‍न आहे. नगरमध्ये नोकरीची संधी उपलब्ध व्हावी. नगरमध्ये आयटी हब्ज उभारले पाहिजे. तरूणांना नोकरीच्या संधी कशा उपलब्ध होतील, यासाठी महापालिकेमार्फत कार्यशाळा घेणे गरजेचे आहे.

– हृषिकेश कोठुळे, केडगाव


पथदिव्यांची तत्काळ दुरुस्ती करावी

शहरात आज ठिक-ठिकाणचे पथदिवे बंद अवस्थेत आहेत. नीलक्रांती चौक परिसरात अनेक ठिकाणी पथदिवे बंद अवस्थेत आहेत. सकाळी व्यायामासाठी जे नागरिक त्यांना रस्त्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे बऱ्याचदा छोटेमोठे अपघात घडत आहेत. पथदिवे बंद झाल्यास त्यांची दुरूस्ती तत्काळ केली जात नाही. सकाळी काही ठिकाणी बराच वेळापर्यंत पथदिवे सुरू असतात, त्याचबरोबर सायंकाळीही अनेकदा 5-6 वाजताच पथदिवे सुरू झालेले असतात. यामुळे विजेचा अपव्यय होतो, त्यामुळे त्यावर योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात.

– अशोक चव्हाण, निलक्रांती चौक


महापालिकेने योग्य धोरण अवलंबावे

परिसरातील औद्योगिक वसाहती ओस का पडत आहेत. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्या का येत नाहीत. नगर शहरात नवीन कंपन्या येण्यापेक्षा जाण्याकडे अधिक भर आहे. यामुळे अनेक तरूणांचे रोजगार गेले, यासाठी नगरकरांनी व महापालिकेने योग्य ते धोरण अवलंबावे.
– सुभाष शेळके, सावेडी


महापालिकेला जाब विचारायला हवा

सर्वच जबाबदारी ही महापालिकेची नाही. आपन नागरिक म्हणून आपलीदेखील मोठी जबाबदारी आहे. कचऱ्याच्या गाड्या येत नाही. पाणी येत नाही यासाठी आपण कधी आंदोलन केले का? प्रत्येक गोष्टीसाठी आपण आंदोलन केले तर, महापालिकादेखील आपले काम व्यवस्थित करेल, प्रत्येक कामाबद्दल आपण महापालिकेला जाब विचारायला हवा, तरच नगरचा विकास होईल.

– निकेतन तडके, पाईपलाईन रोड


शहरातील रस्त्याची दुर्दशा

या परिसरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत आहे. तसेच या परिसरातील रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. यामुळे या रस्त्यावर अनेकदा अपघात होतात. तसेच दवाखान्याच्या रुग्णवाहिका या रस्त्याने जाताना चालकाना व रुग्णांना त्रास होतो. याची दखल महापालीकेने घ्यावी व रस्त्याची दुरुस्ती करावी.

– प्रियंका थोरात, सावेडी.


ध्वनी मर्यादेचे उल्लंघन होतेय

शहरात ज्या भागात दवाखाने आहेत, तिथे ध्वनी निषेध असूनही तिथे ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केले जाते. तरी याबाबतीत कडक कारवाई करण्याची आवश्‍यकता आहे. दवाखान्याशेजारी ध्वनी प्रदूषण होत असल्याने याचा रुग्णांना त्रास होतो, त्यांच्या आरोग्यावर विपरीत
परिणाम होतो.

– कल्याणी दारुंटे, चांदणी चौक.


सिग्नल दुरुस्त करावेत

या परिसरातील चौकात सिग्नल बसवणे आवश्‍यक आहे. तसेच शहरातील जे सिग्नल बंद आहेत, त्यांची दुरुस्ती करणे आवश्‍यक आहे. यामुळे या चौकात वारंवार अपघात होतात. अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. ही वाहतुकीची कोंडी फोडताना वाहतूक पोलीसांची धांदल उडते.

– ज्ञानेश्‍वर महामुनी, कलेक्‍टर कचेरी रोड


शाळांमध्ये स्वसंरक्षणाचे धडे द्यावेत.

देशभरात महिला व मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. या घटना थांबविण्यासाठी मुलींना स्वसंरक्षण करता येणे आवश्‍यक आहे. शहरातील सर्व शाळांमध्ये स्वसंरक्षणाचे धडे देणे गरजेचे आहे. याबाबतीत महापालीकेने विविध उपक्रम राबवणे आवश्‍यक आहे.

– मोनीका चौगुले, डी. एस.पी.चौक.


पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा

नगर शहर सांस्कृतिक केंद्र आहे. गेल्या काही वर्षात खुप मोठी सांस्कृतिक जडणघडण शहराने केली आहे. महापालीकेने या विभागासाठी स्वतंत्र दालन करावे, की जेथे कला, साहित्य, नाट्य कमी दरात उपलब्ध होतील. यामुळे शहरातील सांस्कृतिक विकासास चालना मिळेल. व नगरमध्ये सांस्कृतिक क्षेत्रात नवनिर्मिती होईल.

– आदिनाथ गाडे, बालीकाश्रम रोड.


कायमस्वरुपी नियमांची आवश्‍यकता

शहरात वारंवार वाहतुक, ध्वनीप्रदुषण, अतिक्रमण याबाबत विविध नियम केले जातात. या नियमांची ठराविक काळ अंमलबजावणी केली जाते, परंतू नंतर हे नियम सर्रास मोडले जातात. नागरिकांसाठी आवश्‍यक अशा नियमांचे कायमस्वरुपी पालन केले जावे.

– प्रिया वावगे, पाईपलाईन रोड.


 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)