नगरकर बोलू लागले…हितसंबंध साधून कामे

थदिवे केवळ नावालाच

सारसनगर परिसरात पथदिव्यांची अवस्था अत्यंत बिकट बनलेली आहे. मनपाने बसविलेले पथदिवे केवळ नावापुरतेच उरलेले आहेत, पहाटेच्या वेळी व्यायाम करण्यासाठी रस्त्यांवर उजेड नसतो, त्यामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अंधारामध्ये अपघात होण्याची दाट शक्‍यता असते, असे अनेक प्रकार या परिसरात घडलेले आहेत. तरी पालिकेमार्फत पथदिव्यांची दुरूस्ती करण्यात यावी आणि होणारे अपघात टाळण्यास मदत करावी. – अंजली आगरकर, सारसनगर


शहर बससेवा सुरू करा

केडगाव परिसरात राहते, या परिसरामधून नगर शहरात महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी दररोज ये-जा करावी लागते, महापालिकेमार्फत बसची सुविधा सुरू करणे गरजेचे आहे, मात्र आजमितीस यासाठी रिक्षाचे भाडे विद्यार्थ्यांसाठी परवडणारे नाही, त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांसाठी

– मयूरी वाजे, केडगाव शिवाजीनगर

 


प्रभागाच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्यावे

बालिकाश्रम रोड परिसराचा हा प्रभाग मोठा झालेला आहे. जिल्हा परिषद गटासारखी परिस्थिती महापालिका प्रभागाची झालेली आहे, कदाचित त्यामुळेच नगरसेवकांना प्रभागामधील प्रत्येक भागामध्ये विकासात्मक कामांची सुविधा पुरविणे त्यांना शक्‍य होत नसेल, आता मात्र, भावी नगरसेवकांनी आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल याकडे नगरसेवकांनी लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे.

– रवींद्र वर्पे, बालिकाश्रम रोड

 

 


खड्ड्यांचे नगर असे नाव द्या

शाहुनगर परिसरातील रस्त्यांची परिस्थिती अशी आहे की, आज शाहुनगर न म्हणता खड्ड्यांचे नगर असे नाव द्यावे, कारण या भागातील रस्त्यांची आजची स्थीती पाहिली तर, रस्त्यात खड्डे आहेत की, खड्ड्यात रस्ते हे शोधणे काहिसे कठिण आहे. काही काळापूर्वी रस्त्यांची कामे झालेली आहेत, मात्र काही दिवसांमध्ये हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे, त्यामुळे या भागामध्ये रस्त्यांची कामे होणे गरजेचे आहे.

– विशाल रणसिंग, शाहुनगर


स्पर्धा परीक्षा केंद्रांची संख्या वाढवावी

महापालिकेमार्फत स्पर्धा परीक्षा केंद्रांची संख्या वाढविली पाहिजे, जे गरजू विद्यार्थी आहेत, त्यांना पुस्तके आणि अभ्यास करण्यासाठी जागेची उपलब्धता करून द्यावी, 15 दिवसाला यशस्वी शासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात यावे, त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल, आणि भावी अधिकारी घडले जातील.
– दिप्ती किठे, ढवण वस्ती पाईपलाईन रोड


 

हितसंबंध साधून कामे

आम्ही ज्या परिसरात राहतो, त्या भागाचा नगरसेवक कोण आहे, हेच आम्हाला मागील पाच वर्षांमध्ये समजले नाही, आपले हितसंबंध साधूनच त्या-त्या भागामध्ये काही विकासाची कामे केली जात असतात, त्यामुळे काही भाग विकासाची कामे होण्यापासून वंचित राहतो.
जया साळवे, सिद्धार्थनगर.

 


 

महापालिकेमार्फत उपाययोजना व्हाव्यात

आम्ही महापालिका क्षेत्रामध्ये हातगाडीवर आपली उपजिवीका भागविण्यासाठी छोटे-मोठे व्यवसाय करत असतो, हे करीत असताना महापालिकेमार्फत जागेची पावती फाडली जाते, मात्र अतिक्रमण पथक आल्यानंतर आमच्या गाड्यांची तोडफोड करून काहीवेळा उचलून नेल्या जातात, यावर काहीतरी महापालिकेमार्फत तोडगा काढण्याची गरज आहे.
– शाम साळवे, दिल्लीगेट


 

परिसरात स्वच्छतेची आवश्‍यकता

या प्रभागातील रस्त्याची दुरावस्था असून यामुळे अनेकदा अपघात झालेले आहेत. येथील बहुतांशी पथदिवे बंद आहेत. या प्रभागात कचराकुंड्या असल्या तरीही रस्त्याच्या कडेला टाकलेल्या कचऱ्यामुळे परिसरात अस्वच्छता आहे. परिसरात लहान मुलांसाठी गार्ड़न असणे आवश्‍यक आहे. शहरांतर्गत बससेवा नसल्याने खाजगी वाहनाने प्रवास करताना अधिक खर्च होतो.
– विनायक कदम, पद्मानगर.


मोकळ्या जागेत गार्डन करावे

या परिसरात अनेक वर्षापासून मोकळ्या पडलेल्या जागेत गार्डन करण्यात यावे. त्या मोकळ्या जागेत कचरा टाकल्याने परिसर अस्वच्छ झाला आहे. परिसरातील रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्‍यक आहे. परिसरात विजेचाही लपंडाव सुरु असतो. या परिसरात रस्त्याच्या कडेला कचराकुंड्या बसवणे आवश्‍यक आहे. पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे आवश्‍यक आहे.
– अशोक जगधने, गायकवाड मळा.


विकासपेक्षा आस्थापनेवर खर्च

महापालिके उत्पन्न मर्यादित आहे. मालमत्ताकराच्या माध्यामातून मोठा कर मिळतो. अन्य उत्पन्नाचे स्त्रोत महापालिका करता आले नाही. अर्थात राजकीय इच्छशक्‍ती नसल्याने हे शक्‍य झाले नाही. परंतू यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी महापालिकेत केलेली फुगीर भरती आज विकास कामांच्या आड येत आहे. महापालिकेच्या उत्पन्नाचा बहुतांशी हिस्सा हा कर्मचाऱ्यांच्या पगारासह आस्थापनेवर खर्च होत आहे. त्यामुळे विकास कामांना निधीच उपलब्ध होत नाही. तांत्रिक अधिकाऱ्यांची संख्या कमी पण कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. आजही अनेक कर्मचारी आजी-माजी नगरसेवकांसह राजकीय पक्षाच्या घरात काम करीत आहे. पगार महापालिकेचा पण कामे या राजकीय नेत्यांची.

– संतोष भोंग, पाईपलाईनरोड,


 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)