नगरकर बोलू लागले…पार्कींगची व्यवस्था होणे गरजेचे

जागेचा वापर पार्कींगसाठी व्हावा

परिसरामध्ये रस्त्यांची कामे व्हायला हवे. परिसरामध्ये कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात येत नाही. मोकळ्या जागेचा वापर पार्कींगसाठी करण्यात यावा, रस्त्यावर पाईपल लाईनसाठी खड्डे करण्यात आले, मात्र त्याची दुरूस्ती पुन्हा करण्यात आली नाही. त्याचबरोबर परिसरामध्ये खेळाचे मैदान होणे गरजेचे आहे.

– शैलेश देशमुख, गुलमोहर रोड


परिसरात उद्यान उभारणे गरजेचे

आमच्या परिसरामध्ये पाणी 2-3 दिवसांनी सुटते. परिसरामध्ये पथदिवे होणे अपेक्षित आहे. काही प्रमाणात पथदिवे आहेत, मात्र काही बंद अवस्थेत आहेत. परिसरामध्ये लहान मुलांसाठी खेळण्यासाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी उद्यान होणे गरजेचे आहेत. बऱ्याचदा घंटा गाडी वेळेवर येऊन कचरा उचलला जात नाही. काही ठिकाणी कचरा कुंड्यांची कमतरतादेखील आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
– मयुर गोडळकर, केडगाव


पार्कींगची व्यवस्था होणे गरजेचे

परिसरामध्ये पार्कींगची व्यवस्था होणे अत्यंत गरजेचे आहे. पार्किंगची सुविधा नसल्याने परिसरात सर्व वाहने वाट्‌टेल तेथे उभी केली जातात. परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी साथींच्या आजारांनी थैमान घातले होते, या महापालिकेतर्फे डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही उपाययोजना व्हायला हव्यात. कचरा कुंड्यांचा अभाव काही प्रमाणात दिसून येतो. पथदिव्यांचा अभाव काही प्रमाणात दिसून येतो. त्यामुळे रात्री महिलांना घराबाहेर पडणे कठीण होते.
– तुषार ढवण, जूना सिव्हील हॉस्पीटल परिसर


कुत्र्यांचा उपद्रव वाढला

परिसरामध्ये काही भागामध्ये ड्रेनेज लाईनची दूरावस्था झाली आहे. त्याचबरोबर काही भागामध्ये कचरा व्यवस्थापन करणेही अत्यंत आवश्‍यक आहे. या भागामध्ये मोकाट कुत्र्यांचा उपद्रव अधिक प्रमाणात वाढलेला दिसून येतो. काही दिवसांपूर्वी मोकाट कुत्र्यांना पकडून नेण्यात आले, मात्र काही दिवसांनी तेच कुत्रे पुन्हा आले व कुत्र्यांची संख्या वाढतच आहे. परिसरामध्ये तसेच रस्त्यांच्या बाजूला बाभळींचे प्रमाण वाढलेले आहे. त्यांचीही विल्हेवाट लावली जावी. त्याचबरोबर डासांचा प्रादुर्भावदेखील अधिक आहे. त्यावर डासांवर प्रतिबंध म्हणून काही उपाययोजना व्हायला हव्यात.
– सारंग देशपांडे, रासनेनगर, सावेडी


परिसरामध्ये वाचनालय व्हावीत

परिसरातमध्ये वाचनालयांची नितांत आवश्‍यकता आहे. अबालवृद्ध तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी वाचन संस्कृती जपण्यासाठी वाचनालये करणे गरजेचे आहे. काही नगरसेवकांनी यासाठी प्रयत्न केला आहे मात्र पुस्तकांची अनुपलब्धतेमुळे त्यांचे ध्येय पूर्ण होऊ शकलेले नाही. अनेक जण या प्रतिक्षेत आहेत. तसेच परिसरामध्ये वृक्षारोपण होणे गरजेचे आहे. पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी तसेच परिसर प्रसन्न होण्यासाठी वृक्षारोपणाची गरज आहे. महापालिकेने नागरिकांना वृक्ष मोफत पुरविण्याची व्यवस्था करावी. सारसनगर पुलावर जो रस्ता खराब होता तो आता अत्यंत व्यवस्थित झाला आहे. याबद्दल महापालिकेचे अभिनंदन मात्र या व्यतिरिक्‍त जॉर्गीग ट्रॅक होणे, गरजेचे आहे. यासाठी परिसरातील गणेश मंडळांतील तरुणांनी एकत्र येवून नवरात्री व गणेशोत्सव या कालवधीत परिसरात मोठे प्रकल्प राबवावेत जेणेकरुन लोकांमध्ये जनजागृती होईल अशी आशा करतो.

– गिरीश भांबरे, सारसनगर 


दिव्यांगांसाठी पार्कींगची सोय असावी

शहरामध्ये वाहतूक करताना मग ती दुचाकीवरुन असो अथवा चारचाकीतून नागरिकांना अत्यंत त्रास होतो. रस्त्यातील खड्डे, कापड बाजारात असलेली पार्कींगची असुविधा यामुळे सदृढ व्यक्‍ती देखील त्रस्त आहेत तर दिव्यांगांची अवस्था किती दयनीय असेल याचा विचारच न केलेला बरा. अपंग मंडळी गावात वाहतूक करतात तेव्हा त्यांची मोठी तारांबळ उडते. त्याचप्रमाणे महापालिकेने दिव्यांगांसाठी विविध योजना राबवाव्यात. केवळ आपल्याच प्रभागाचा विकास असे धोरण असून नये. तर अपंगांसाठी कार्य करायला हवे. आम्ही महाराष्ट्रीय दिव्यांग मंच नावाची संघटना चालवतो या संघटनेला एनजीओ कडून मदत मिळणे गरजेचे आहे. यासाठी नगरसेवकांनी पाठपुरावा करावा अशी माफक अपेक्षा आहे.

 वसंत शिंदे, नागरदेवळे


स्थानिक नगरसेवकांनी सुधारणा केल्या

आमच्या वॉर्डचे नगरसेवक कलावती शेळके यांनी विविध विकासकामे केली आहेत. पाण्याची व्यवस्था उत्तमरित्या केलेली आहे. त्याचप्रमाणे जॉर्गींग ट्रॅक बनवले आहेत. बागेमध्ये ओपन जिमचे उद्‌घाटन करुन नागरिकांना विरंगुळ्याठी त्याचप्रमाणे व्यायामासाठीही जागा उपलब्ध करुन दिली आहे. त्यांचे सुपुत्र काका चंद्रकांत शेळके यांनीही लोकांशी वारंवार संपर्क ठेवून लोकांना आपलेसे केलेले आहे. “मोबाईल नगरसेवक’ म्हणूनच ते परिसरात चर्चेत आहेत. जेव्हा नागरिकांना काही अडचणी येतात तेव्हा ते लगेच धावून येतात व नागरिकांच्या अडीअडचणीला उपयोगी पडतात.

– मोसीन शेख, सिव्हील हडको


ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान असावे

या प्रभागाच्या रस्त्यावरील खड्डे चुकवताना अनेकदा अपघात होतात. रस्त्याच्या कडेला कचराकुंड्याची आवश्‍यकता आहे. शहरांतर्गत बससेवा नसल्याने खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो. त्यामुळे खर्च अधिक येतो. परिसरातील पथदिव्यांची दुरुस्ती करणे आवश्‍यक आहे. या परिसरात जेष्ठ नागरिकांसाठी व लहान मुलांसाठी उद्यानाची आवश्‍यकता आहे.

– गजानन सावंत, जेष्ठ नागरिक, गुलमोहर रोड.


रस्त्याच्या कडेला कचराकुंड्या असाव्यात

रस्त्याच्या कडेला कचराकुंड्याची आवश्‍यकता आहे. यामुळे परिसरात स्वच्छता राहील. शहरांतर्गत बससेवा नसल्याने खाजगी वाहनाने प्रवास करताना मनस्ताप होतो. परिसरात पथदिवे आहेत. रस्ते दुरुस्त आहेत. कचरागाडी नियमीत येणे आवश्‍यक आहे. परिसरात वाचनालय असावे. पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन आवश्‍यक आहे.
– अनिल सोनवणे, प्रेमदान चौक.


 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)