नगरकर बोलू लागले…संपर्कात असणारा नगरसेवक हवा

संपर्कात असणारा नगरसेवक हवा

निवडणुकीच्या तोंडावर अनेक उमेदवारांना आपापल्या प्रभागात अचानक ज्या समस्यांचा शोध लागलाय तो अनाकलनीय आहे. निवडणूक जवळ आली असताना इतक्‍या समस्या दिसल्या, मग या आधी प्रभागात काही समस्याच नव्हत्या का, असा प्रश्‍न पडतो. या सर्व समस्या त्यांना मागील 5 वर्षात दिसल्या असत्या आणि त्यावर योग्य वेळी अंमलबजावणी झाली असती, तर आज त्यांना असं मतं मागण्यासाठी दारोदार फिरायची वेळच आली नसती. मतदारांनी च त्यांना डोक्‍यावर घेतलं असतं. यासाठी कायमस्वरुपी नागरिकांच्या संपर्कात असणारा नगरसेवक हवा.

– अप्रतिम मुळे, घुमरे गल्ली 


रस्त्यांचा प्रश्‍न सोडविण्याची नितांत गरज 

शहरामध्ये ठिकठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. बालिकाश्रम रोडचे काम या टर्मच्या नगरसेवकांनी चांगले केले आहे याचा अपवाद वगळता सर्वत्र रत्यांची दुरावस्था झालेली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. यामध्ये व्यावसायानिमित्त जास्त प्रवास करणाऱ्या मंडळींची त्रेधातिरपट उडते. त्याचप्रमाणे वृद्धांनाही रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे मोठा त्रास होतो. तरुणांचीही परिस्थिती काही वेगळी नाही रस्त्यांमुळे मणके, सांधेदुखी यांचे विकास होतात. या सर्व परिस्थितीला महानगरपालिका जबाबदार आहे. वेळच्या वेळी रस्त्यांची डागडुजी व डांबरीकरणाचे काम करण्याची नितांत गरज आहे. त्याचप्रमाणे पाण्याचा प्रश्‍नही मोठाच आहे.

– पंकज दरक, कवडेनगर 


शहरामध्ये अद्ययावत उद्याने हवीत

गरमध्ये पुर्वी सिद्धीबागेसारखी दर्जेदार बाग होती. मात्र आता त्या बागेची काय अवस्था झाली आहे हे आपण सर्वच पाहत आहोत. बागेतील खेळण्या तुटल्या आहेत. नागरिकांसमोर सुटीच्या दिवशी विशेषत: रविवारी मुलांना कोठे खेळायला न्यायचे याचा यक्ष प्रश्‍न आहे. शहरामध्ये काही वसाहतींचा अपवाद वगळता सर्वत्र कचरा व दुर्गंधीचे साम्राज्य आहे त्यामुळे परिसरात अनारोग्य निर्माण होते. उपनगरातील लक्ष्मी उद्यान, गंगा उद्यान, शहिद भगतसिंग उद्यान ही आहेत मात्र गावात राहणाऱ्या नागरिकांना ती लांब पडतात आणि या उद्यानांच्या दुरुस्तीचाही प्रश्‍न आहेच. यासाठी महापालिका प्रशासनाने शहराच्या मध्यवर्ती परिसरात अद्ययावत उद्यान उभारावे आणि अशा उद्यानाची कमतरता नागरकरांसाठी नवीन नाही.

– नयन कुलथे, बागरोजा हडको 


पाणीपट्टी वेळेवर भरुनही पाणी नाही

 आम्ही पाणीपट्टी अत्यंत वेळेवर भरतो. महापालिकेचा कुठलाच कर बुडवित नाहीत. मात्र आम्हाला अत्यंत कमी दाबाने आणि केवळ पिण्या पुरतेच पाणी मिळते. ही अत्यंत गंभीर समस्या आहे. वारंवार पाणीपुरवठा विभागात खेटे घालूनही ही समस्या सुटत नाही. पुलाचा आणि रस्त्याचा प्रश्‍नही मोठ्या प्रमाणात भेडसावतो आहे. तसेच नगर-पुणे येथील पुलावरुन अनेक वाहनांचे जिवघेणे अपघात होतात.

– सागर शिंदे, केडगाव 


रस्ता दुरूस्त करण्याची गरज 

पूर्वीच्या नगरसेवकांकडून काहीही शाश्‍वत कामे झालेली नाही. बोल्हेगाव फाटा ते मनमाड हायवेपर्यंत प्रभागातील रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यात आले होते. परंतु एका वर्षात तो रस्ता पुन्हा उखडलेला आहे. तो रस्ता दुरुस्त करण्याची खूप गरज आहे. बोल्हेगाव फाटा ते राघवेंद्र स्वामी कमानीपर्यंत एमआयडीसीपर्यंत रस्ता मुख्य वहिवाटीचा आहे. परंतु या रस्त्याचेही काम अपूर्ण आहे. बोल्हेगाव फाटा ते गणेश चौक रस्त्याचे पाच वर्षात काम झाले नाही. प्रभागात मुलांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान नाही. तसेच एमआयडीसीत काम करणाऱ्या कामगारांची मोठी वसाहत बोल्हेगाव परिसरात आहे. अशा लोकांसाठी मूलभूत सुविधा, विकासात्मक कामे करावी. प्रभागात सर्वत्र दुर्गंधी, पाणीप्रश्‍न आदी समस्या आहे. नवनिर्वाचित नगरसेवक हा सुशिक्षित, नव्या चेहऱ्याचा व सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांची जाण असणारा असावा.

– सिध्देश्‍वर मेटे, बोल्हेगाव फाटा 


शहरांतर्गत बससेवा असावी 

या प्रभागात रस्त्याच्या कडेला कचराकुंड्या नसल्याने कचरा अस्ताव्यस्त पडलेला असतो. कचरागाड्या दररोज येणे आवश्‍यक आहे. शहरांतर्गत बससेवा नसल्याने खाजगी वाहनांनी प्रवास करताना अधिक खर्च होतो. प्रत्येक चौकात बसथांबा करुन नागरिकांची अडचण दूर करावी. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी. पथदिव्यांची दुरुस्ती करणे आवश्‍यक आहे.

– अनिकेत कदम, एकविरा चौक


 
अद्ययावत वाचनालयांची गरज 

परिसरामध्ये रस्त्यांची कामे झालेली आहेत. त्याचबरोबर पाणी पुरवठयामध्ये अनियमितता आहे. परिसरामध्ये उद्यान व्हावे, त्याचबरोबर वाचनालय होणे अपेक्षित आहे. परिसरामध्ये स्वच्छता केली जाते, मात्र घंटा गाडी वेळेवर येऊन कचरा उचलला जात नाही. प्रभागामध्ये पथदिवे आहेत, मात्र काही बंद अवस्थेत आहेत. प्रभागात शौचालय आहेत, मात्र त्याच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्याचबरोरबर परिसरामध्ये व्यायामशाळा होणे अपेक्षित आहे. तसेच सामाजिक उपक्रम राबविणे गरजेचे आहे.

– नितीन बुगे, नालेगाव 


मोकाट जनावरांना आळा घालावा 

या परिसरात रस्त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. परिसरामध्ये सार्वजनिक सौचालय होणे गरजेचे आहे. कचरा व्यवस्थापनदेलील होणे आवश्‍यक आहे. परिसरात मोकाट जणावरांचा उच्छाद वाढलेला दिसून येतो. त्याचबरोबर परिसरामध्ये खेळाचे मैदान होणे गरजेचे आहे. परिसरातील कचरा उचलण्यासाठी घंटागाड्यांची वारंवारता वाढवावी.

– अनिरूद्ध तिडके, नालेगाव 


कचऱ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे 

पूर्वीच्या नगरसेवकांनी प्रभागात एलईडी दिले लावले. इमारतीला तसेच इमारतीसमोरही कॉंक्रिटीकरण केले. पूर्वी प्रभागात नियमित कचरागाडी येत होती. परंतु आता मात्र कचरागाडी येत नाही. समोरच कचराकुंडी होती. परंतु ती हटविल्याने कचऱ्याची मोठी समस्या आहे. सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. कचऱ्याची कुठलीही विल्हेवाट होत नाही. पाण्याचीही मोठी समस्या असून पाणी कमी येत असून तेही दिवसाआड येते. प्रभागात लहान मुलांसाठी उद्यानाची व्यवस्था करावी. तसेच सिव्हील हडको ते सिव्हील हॉस्पिटलचे कॉर्टरला जोडणारा ओढ्याचा अरुंद पूल आहे.

– विजय कल्हापुरे, सिव्हील हडको 


 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)