नगरकर बोलू लागले…प्रभागामध्ये सुरक्षाव्यवस्था हवी 

प्रभागामध्ये सुरक्षाव्यवस्था हवी 

रस्त्यामध्ये खांब उभे असल्यामुळे वाहतूकीस अडथळा होतो. परिसरातील बगीचामध्ये सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे तेथे बाहेरील लोक येतात त्यात काही व्यभिचारी व धुम्रपान केलेली असतात परिसरात लहान मुले असल्यामुळे यामुळे त्यांच्या बालमनवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. रस्त्यांमध्ये खड्डे खोदून ठेवलेले आहेत ते बुजवावेत. चौकाचौकात पथदिवे बंद असल्यामुळे तो मोठा प्रश्‍न आहे.

– हर्षद लोखंडे, सिव्हिल हडको


चराकुंड्या नसल्याने अस्वच्छता 

प्रभागात रस्ते सुस्थितीत आहेत. पथदिवे दुरुस्त आहेत. कचरागाडी वेळेवर येत नसल्याने मोकळ्या जागेत कचरा टाकला जातो. कचराकुंड्याची दुरावस्था झाली आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. पिण्याच्या पाणी संदर्भातील अनियमिततेमुळे नागरिकांची धांदल उडते. परिसरात वाचनालयाची आवश्‍यकता आहे.

– अमोल सोनवणे, प्रेमदान चौक


रस्त्याची रुंदी कमी असल्याने अपघात 

या प्रभागात रस्त्याची दुरावस्था असून रस्त्याची रुंदी अतिशय कमी आहे, त्यामुळे अपघात होतात. पथदिवे बंद आहेत. कचराकुंड्या आहेत, मात्र रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जात असल्याने परिसर अस्वच्छ आहे. शहरांतर्गत बससेवा नसल्याने खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो, यामुळे खर्च अधिक येतो.

– राजेंद्र कदम, पद्मानगर 


प्रभागात प्रतिनिधी मंडळ स्थापना करावे 

एखाद्या समस्येबाबत नागरिकांनी उमेदवारांकडे गेल्यास लोकप्रतिनिधींनी हद्दीबाबत प्रश्‍न उपस्थित करुन नागरिकांची हेळसांड करु नये. तसेच संबंधित उमेदवार ज्या हद्दीत राहत असेल त्या हद्दीतील नगरसेवकाला त्या व्यक्‍तीच्या समस्या सोडविण्यासंबंधी सूचना द्याव्यात. प्रभाग स्वच्छ सुंदर व्हावा. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राची व्यवस्था करावी. तेथे नागरिकांना अल्पदरात अथवा मोफत उपचार मिळावेत. प्रभागातील समस्या सोडविण्यास प्रतिनिधी मंडळाची स्थापना करावी. त्या मंडळामार्फत जनतेच्या समस्या सोडवाव्यात. युवकांसाठी नवरोजगार निर्मितीसाठी महापालिकेत पाठपुरावा करावा. वृध्द, ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजना राबविण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच शैक्षणिक उपक्रम राबवावेत.

– प्रवीण सोनवणे, सिध्दार्थनगर 


वाहतूक कोंडी नित्याचीच 

प्रभागात अनेक समस्या आहेत. अमरधाम येथे अंत्यसंस्कारासाठी खूप गर्दी जमते. त्यावेळी चौकामध्ये मोठी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे कल्याण रस्त्याकडील प्रवेशद्वारे अंत्यसंस्कारासाठी खुले करणे महत्वाचे वाटते. तसेच चौपाटी कारंजावरील हॉकर्स जागा निश्‍चिती करुन द्यावी. रस्त्यातच कशाही पध्दतीने खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल लावले जातात. त्यामुळे तेथे वाहतूक कोंडी नित्याचीच होत आहे. तसेच नेहरु मार्केट पाडल्यानंतर भाजीविक्रेत्यांना प्रभागातील गाडगीळ पटांगणात विक्रीसाठी जागा देण्यात आलेली होती. परंतु भाजीविक्रेते पटांगणाबाहेरच रस्त्यावरच भाजीविक्रीसाठी बसतात. त्यामुळे नेहरु मार्केटचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे. तसेच प्रभागातील उघड्या गटारी, सांडपाणी आदी समस्येचे निराकरण नवनियुक्‍त नगरसेवकांनी करावे.

– रावसाहेब काळे, नालेगाव 


मोकळ्या जागेत गार्डन व्हावे. 

या प्रभागात रस्त्यांची दुरुस्ती होणे आवश्‍यक आहे. विजेचा लपंडाव असतो. परिसरात अनेक वर्षापासून मोकळ्या असलेल्या जागेत गार्डन व्हावे. कचरागाडी वेळेवर येते. परिसरात रस्त्याच्या कडेला कचराकुंड्या बसविणे आवश्‍यक आहे. पोलिसांची नियमित गस्त असल्याने चोऱ्याचे प्रमाण नगण्य आहे. पथदिवे सुस्थितीत आहेत. पिण्याची पाण्याची सुविधा आहे.

– हरिप्रसाद गारडे, गायकवाड मळा, सावेडी 


फेज टू योजना कधी होणार पूर्ण 

शहरासह उपनगरात शहर वाढीव पाणीपुरवठा (फेज दू ) योजने काम गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. हे काम कधी पूर्ण होणार असा प्रश्‍न पडतो. या कामांसाठी सातत्याने रस्ते खोदण्यात येतात. त्यामुळे नगरकरांना चालणे देखील मुष्कील झाले आहे. जे सत्ताधारी होते आज ते विरोध आहे. आणि जे विरोध झाले ते सत्ताधीश होते असे गणित वारंवार महापालिकेत झाले. पण पाणीयोजना काही पूर्ण झाली नाही. कोट्यवधी रुपये खर्च होत आहे. या कामांचा दर्जा देखील निकृष्ट झाला आहे. कोट्यवधीची पाईप खरेदी असेल, त्यात किती घोटाळा झाला हे आता नगरकरांना माहित आहे. कोणाच्या काळात हा पाईप खरेदी घोटाळा झाला. तेथून खऱ्या अर्थाने या योजनेची वाट लागली आहे. त्याला कोण जबाबदार आहे. पुढील काही वर्षांसाठी योजना आहे. गेल्या दहा वर्षांपासून काम सुरू आहे. पण ते अद्यापही पूण झाले नाही.
– पंढरीनाथ गायकवाड, सावेडी 


 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)