नगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी


शहर बससेवा सुरळीत व्हावी

शहरातील बससेवेचा खेळखंडोबा कोणामुळे झाला आहे, हे काही समजतच नाही. प्रशासन लोकप्रतिनिधींकडे बोट दाखविते, तसेच लोकप्रतिनिधी प्रशासनाकडे असे पहावयास मिळते, सर्व एकमेकांना खोला खो देत आहेत. मात्र यामध्ये नुकसान केवळ विद्यार्थ्यांचेच होत आहे. त्यांना रिक्षासाठी अतिरीक्‍त भाडे द्यावे लागते. अशी आशा बाळगते की, या निवडणुकीनंतर तरी ही शहरबससेवा सुरळीत सुरू होईल.
– दीपाली रोडे, दिल्ली गेट


सार्वजनिक वाचनालयांची संख्या वाढवा

संपूर्ण शहरात वाचनालयांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. तरूण पीढी उत्तम घडवायची असेल तर, उत्तम पुस्तके तरूणांच्या डोळ्याखालून जायला हवीत. मात्र आज अशी परिस्थिती आहे की, अभ्यासक्रमांचीच पुस्तके घेतली जात नाहीत तर, अवांतर वाचनाचा विषयच सोडा, विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लागावी, यासाठी महापालिकेमार्फत अधिकाधिक वाचनालयांची सुविधा पुरवाव्यात.
– नंदिनी घालमे, निलक्रांती चौक


सावेडी उपनगरात मैदानाची गरज

शहराच्या मध्यभागी जसे वाडीया पार्क मैदान आहे, त्याचप्रमाणे सावेडी उपनगरातदेखील एक मैदान असायला हवे. उपनगरातून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या वाडिया पार्क येथे जाण्यासाठी खुप अंतर कापावे लागते. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या सरावावरदेखील होतो, त्यामुळे सावेडी उपनगरामध्येदेखील एक मैदान होणे गरजेचे आहे.

– पल्लवी शिंदे, नम्रता कॉलनी पाईपलाईन रोड


कचऱ्याचे व्यवस्थापन करा

या परिसरात बंदिस्त गटारांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. तसेच काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग असल्यामुळे रहदारीस अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करा.

– लक्ष्मीकांत पाटील, गुरुकृपा कॉलनी


महापालिकेकडून एक पथक नेमावे

केडगाव परिसरात प्रत्येक घरामध्ये शौचालय आहे, मात्र त्याचा वापर अत्यल्प प्रमाणात केला जातो, या भागातील जास्तीत जास्त लोक हे उघड्यावरच शौचास बसतात, यावर महापालिकेमार्फत एक विशेष पथक नेमून त्यावर कार्यवाही करण्याची आवश्‍यकता आहे.
– प्रीया शेळके, केडगाव


अतिक्रमणे काढावीत

या परिसरातील अतिक्रमणे दूर करावीत. या भागात जाहिरातींचे अनावश्‍यक होर्डिंग्स लावले जात असल्यामुळे वाहतुकीस अडचण निर्माण होत आहे, त्यामुळे त्यांना स्वतंत्र जागा द्यावी.
– उमा देशपांडे, प्रोफेसर चौक


महापालिकेच्या शाळांची सुधारणा व्हावी

या परिसरातील महापालिकेच्या शाळांची दुर्दशा झाली आहे. तसेच या भागातील काही ठिकाणी रस्त्यांच्या डांबरीकरणाची व बंदिस्त गटारांची कामे अजूनही रखडलेली आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
– प्रणव देशपांडे, भूतकरवाडी


स्वच्छतागृहांची सुधारणा करावी

या परिसरातील स्वच्छतागृहांची दुर्दशा झाली असल्यामुळे दुर्गंधी येते, स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई होत नाही, तरी महापालिकेने या गोष्टीची दखल घ्यावी.
– वैष्णवी साबळे, चौपाटी कारंजा


अवजड वाहनांना बंदी करावी

या परिसरात दिवसेंदिवस अवजड वाहनांची संख्या वाढत आहे, त्यामुळे वाहतूक कोंडीच्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. अवजड वाहनांना शहरात बंदी असतानाही अशी वाहने शहरात दिसतात तरी, याची दखल महापालिकेने घ्यावी.
– दिपाली जोशी, डीएसपी चौक परिसर


झाडांची संख्या वाढवा

या परिसरातील वाढलेल्या वेड्या बाभळीमुळे नागरिकांना त्रास होत आहे. काही ठिकाणी रस्त्यांचे डांबरीकरण केलेले नाही. याशिवाय पर्यावरणाच्या दृष्टीने विचार केला असता, या भागात वृक्षांचे प्रमाण कमी आहे. तरी महापालिका क्षेत्रांत वृक्षारोपन होणे गरजेचे आहे.
– पूजा महाजन, साईराम नगर


(संकलन- रोहित भोंदे, कोमल पाटील)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)