नगरकर बोलू लागले…नागरिकांना विश्‍वासात घ्यावे

 

नागरिकांना विश्‍वासात घ्यावे

नवनिर्वाचित नगरसेविकांनी आपापली कामे कोणतेही पक्षीय राजकारण न करता व्यवस्थित करावी. प्रभागातील कामे करताना नागरिकांशी चर्चा करुन त्यांना विश्‍वासात घ्यावे. सर्वप्रकारच्या मूलभूत सोई सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. नगरसेवकांनी जनतेचे प्रश्‍न सामंजस्याने सोडावे.
– प्रकाश खुबचंदानी, सिंधी कॉलनी, तारकपूर

 

 

कचऱ्याची मोठी समस्या…

पूर्वीच्या नगरसेवकांनी तारकपूर भागात चांगली कामे केली. परंतु प्रभागात रस्त्याच्या बाजूने पाच ते सात वीजेचे खांब अडीच वर्षापासून बंद स्थितीत आहेत. त्यामुळे सायंकाळी 7 नंतर परिसरात अंधाराचे साम्राज्य असते. नगरसेवकांना वारंवार सूचना, निवेदने देऊनही ते दुरुस्त होत नाही. सिव्हील हडको परिसरात कचऱ्याची मोठी समस्या असून सर्वत्र साधारणपणे 3 ते 4 फूट अंतरापर्यंत गाजर गवत उगवले आहे. तसेच आजूबाजूला मातीचे ढिगारे मोठ्या प्रमाणात आहेत. गटारीची समस्याही गंभीर स्वरुपाची असून जंतूनाशक औषध फवारणीही नियमितपणे होत नाही. तरी नवनिर्वाचित नगरसेवकाकडून या समस्यांची सोडवणूक होणे गरजेचे आहे.
– डी. जे. खुबचंदानी, सिंधी कॉलनी, तारकपूर

 

उमेदवाराला प्रश्‍नांची जाण असावी…

महानगरपालिकेची निवडणूक निपक्षपातीपणे व्हावी. तसेच निवडणकीपूर्वी प्रभागातील कोणत्याही व्यक्‍तीने प्रलोभनांना बळी पडू नये. निवडणुकीत असलेल्या उमेदवारांची व्यवस्थित पडताळणी करुन निर्भिडपणे मतदान करावे. समाजामध्ये व्यवस्थित मूलभूत सोई सुविधा देणाऱ्या तसेच प्रभागातील प्रश्‍नांची जाण असलेल्या व त्यांची सोडवणूक करु शकणाऱ्या उमेदवारालाच मतदारांनी निवडून द्यावे.
– प्रकाश वडवणीकर, दत्तमंदिर, प्रेमदान चौक

 

कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे साथीचे आजार

प्रभागात पाण्याची समस्या अतिशय गंभीर आहे. फेज 2 ची लाईन टाकलेली असून पुढे कोणतीही कार्यवाही झालेली नाही. कचरा नेण्यासाठी महापालिकेची घंटागाडी नियमित येत नाही. तसेच सफाई कर्मचारही वेळेवर येत नाही. परिणामी परिसरात कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहे. जंतूनाशक फवारणी वेळेवर होत नाही. परिणामी साथीच्या आजारांचा फैलाव करणाऱ्या डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्‍यात आले आहे. तसेच प्रभागात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. अशा कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा. या समस्यांची सोडवणूक नवनिर्वाचित नगरसेवकांनी करावी.
– कांता वाळके,सिव्हील हाडको

 

रस्ते, पथदिवे, पाणी यांची समस्या..

प्रभागात रस्ते, पथदिवे, पाणी यांची समस्या आहे. नियमित साफसफाई नाही. येथील उद्यानामध्ये कचरा, पालापाचोळा मोठ्या प्रमाणात साचलेला आहे. नगरसेवकांकडे वारंवार पाठपुरावा करुनही काहीच उपयोग होत नाही. कधी कधी तक्रार देण्यास गेले तरी लोकप्रतिनिधी वेळेवर भेटत नाहीत. परिसरात पथदिवे असून ते काही भागात चालू तर काही भागात बंद स्थितीत आहे. त्यामुळे बराचसा भाग अंधारातच असतो. नवीन नगरसेवकांकडून वरील कामे पूर्ण होणे गरजेचे आहे.
– रामभाऊ कुलकर्णी, सिव्हील हाडको

 

प्रभागातील रस्ते दुरुस्त व्हावेत

या प्रभागात विद्यमान नगरसेवकांने ड्रेनेजचे काम केले आहे. तसेच फेज- टू चे काम केल्यामुळे विजेचा प्रश्‍न दूर झाला आहे. तसेच रस्त्यालगत असलेले पथदिवे सुस्थितीत आहेत. या प्रभागात कचरागाडी वेळेवर येते असल्याने परिसर स्वच्छ आहे. या परिसरात रस्त्याच्या कडेला कचरा कुंड्या बसविणे आवश्‍यक आहे. पोलिसांकडून नियमीत गस्त घातली जाते, यामुळे चोऱ्यांचे प्रमाण नगन्य आहे. पिण्याचे पाणी दररोज येत नसल्याने अनेकांची तारांबळ उडते. या भागातील रस्ते दुरुस्त व्हावेत ही अपेक्षा आहे.
– राहुल गांधी, प्रोफेसर कॉलनी

 

मोकळ्या जागेचा विकास करावा

प्रभागात कचरा टाकल्यानंतर घंटागाडी खूप उशिरा येते, कचरा बराच वेळ त्या जागी पडून राहातो त्याजागी जनावरे चरत असल्याने तो सर्वत्र पसरतो त्यामुळे दुर्गंधी वाढते. दुसरी महत्त्वाची समस्या म्हणजे वाघमळ्यामधील महापालिकेची 18 हजार स्क्वे. फूट जागा मोकळी आहे. तेथे काही लोकांकडून वैयक्‍तीक फायदासाठी वापर होतो. तसेच नगरसेवकांचेही त्याकडे दुर्लक्ष आहे. त्या जागेवर अतीक्रमणे झाले असून, तेथे जनावरे चरायला सोडली जातात. नवनिर्वाचित नगरसेवकांनी ती जागा विकसित केल्यास तेथे प्रबोधनात्मक कार्यक्रम होऊ शकतील.
– संजय पारनाईक, बडोदा बॅंक कॉलनी

( संकलन – प्रल्हाद एडके, गणेश बोरूडे व वेदकुमार कुलकर्णी )


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)