नगरकर बोलू लागले…मूलभूत सुविधांचा अभाव


मूलभूत सुविधांचा अभाव

प्रभागात अनेक महत्वाच्या समस्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे ड्रेनज लाईन, प्रभागात जी ड्रेनेज लाईन बसविलेली आहे, ती असमांतर तसेच त्यात चढउतार असल्यामुळे त्या लवकरच खराब होतात. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरते. गेल्या सहा महिन्यापासून प्रभागातील जिजामाता वसतिगृहासमोर वीजेचे खांब पडून आहेत. ते त्या जागेवरुन हटविणे गरजेचे आहे. तसेच काही वस्त्यांमध्ये कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहे, मात्र प्रभागात कुठल्याही प्रकारचे कॉंक्रिटीकरण झाले नाही. कचऱ्याची मोठी समस्या असून कचऱ्याचे नियमित संकलन होणे महत्वाचे वाटते. वस्तीत मुलांसाठी व्यायामशाळेची, वाचनालयाची गरज आहे. नवनिर्वाचित नगरसेवकांनी वरील समस्या सोडवणे अपेक्षित आहे.
– योहान गायकवाड,सिध्दार्थनगर


वाचनालयाची आवश्‍यकता

प्रभागात लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत योग विद्याधाम केंद्र असावे. तेथे सर्वांना योग विद्येचे प्रशिक्षण मिळावे. प्रभागात मोफत वाचनालयाचीही आवश्‍यकता आहे. तेथे विविध थोर महापुरुषांची, ज्ञान विज्ञानाची तसेच मुलांच्या बालमनावर यथोचित संस्कार घडविणारी तसेच स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्‍त अशी पुस्तके उपलब्ध असावी. तसेच नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने प्रभागात नवनिर्वाचित नगरसेवकांचे एक संपर्क कार्यालय असावे. कचऱ्याची समस्या गंभीर असून परिसर स्वच्छ राहण्यासाठी वेळोवेळी स्वच्छता मोहीम राबविणे गरजेचे आहे. निराधार महिलांसाठी प्रभागात रोजगार उपलब्ध होईल यासाठी सदैव प्रयत्न करावे, आदी समस्यांची सोडवणूक नवनिर्वाचित नगरसेवकांनी करावी.
– संतोष कांबळे, नगर.


टॅंकरसाठी अतिरिक्‍त खर्च

शिवाजीनगर परिसरात पाणी पुरवठ्यामध्ये अनियमितता आहे. पाणी पुरवठा 8-10 दिवसांनी केला जातो. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते, त्यामुळे टॅंकरवर अतिरीक्‍त खर्च करावा लागतो. मनपातील अधिकाऱ्यांनी तसेच लोकप्रतिनिधींनी आपसातील तू-तू मै-मै करण्यापेक्षा विकासकामांकडे लक्ष द्यावे.

– हनुमंत राऊत, शिवाजीनगर


विकासकामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

सिद्धार्थनगर परिसरात खेळण्यासाठी कोणत्याही प्रकारची मैदाने नाहीत, तरूणांना व्यायामासाठी कोणत्याही व्यायामशाळा नाहीत, येथे दलितवस्ती अधिक प्रमाणात असल्याने विकास कामांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना येथील नागरिकांमध्ये बनली आहे. विविध मूलभूत सुविधांचा याठिकाणी अभाव दिसून येतो.

– उमेश शेलार, सिद्धार्थनगर


दूषित पाण्याचा पुरवठा

पोलीस हेडकॉर्टर परिसरात पिण्याच्या पाईपलाईन बऱ्याच ठिकाणी लिकेज असल्यामुळे त्यामध्ये दुषित पाणी जाते, आणि दूषित पाण्याचाच पुरवठा होतो, मातीमिश्रीत तसेच गंजयुक्‍त पिवळ्या पाण्याचा पुरवठा होत असल्याचे दिसून येते. पाणी पुरवठा त्यामुळे परिसरातील पोटदुखी तसेच पोटांचे विविध आजारांचे प्रमाणात वाढ झाली आहे.

-सुशील सोनवणे, पोलीस हेडक्‍वॉर्टर


मोकाट जनावरांचा प्रश्‍न गंभीर

बोल्हेगाव फाटा परिसरात तसेच शहराच्या विविध ठिकाणी जाताना मोकाट कुत्र्यांचा तसेच मोकाट जनावरांचा वावर रस्त्यांवर अधिक प्रमाणात दिसून येतो. जनावरांना रस्त्यावरील काही अपघातामध्ये इजा झाल्यास त्यावर उपाययोजना होत नाही, ती जनावरे तसेच रस्त्यांमध्ये तसेच परिसरात फिरत असताना दिसून येतात.

-महादेव शिंदे, बोल्हेगाव फाटा


पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन आवश्‍यक

या प्रभागात रस्ते सुस्थितीत आहेत. पथदिवे आहेत. परंतू पिण्याच्या पाण्याबाबत अनियमीतता असल्याने पाणी आल्यानंतर अनेकांची धांदल उडते. पाणी येण्याची वेळ निश्‍चित करणे आवश्‍यक आहे. नोकरीनिमित्त दिवसभर बाहेर असणाऱ्या नागरिकांना अनेकदा पाण्यापासून वंचित रहावे लागते. तसेच या परिसरात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवणे आवश्‍यक आहे.
– कार्तिक सोनवणे, प्रेमदान चौक.


श्रेयवादातून नगरचा विकास खुंटला

नगरच्या विकासासाठी आजवर एकही पक्षाने कामे केले नाही. आजही नगरकर नवनीतभाई बार्शिकर यांचे नाव घेतात. कारण त्यांनी नगराध्यक्ष असतांना केलेली विकास कामे आजही नगरकरांच्या समोर आहेत. बार्शिकर यांच्यानंतर काही प्रमाणात माजी महापौर संदिप कोतकर यांचे नाव घेतले जात होते. परंतू ते आता लांडे खून प्रकरणामुळे विस्मरणात गेले आहे. विकास कामांसाठी ज्या प्रमाणे बार्शिकरांचे नाव घेतले जात आहे. ते अन्य नेत्यांचे का घेतले जात नाही. याचे आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. नगरकर देखील भावनिक राजकारणाला बळी पडून आपल्या पायावर धोंडा पाडीत आहे. नगर शहराच्या विकासासाठी नेतृत्व गरज आहे. ते जोपर्यंत मिळत नाही. तो शहराची स्थिती अशीच राहणार खड्ड्यात रस्ते की रस्त्यावर खड्डे.
– प्रमोद शिंदे, सावेडी


पाच वर्षे नगरसेवक फिरकला नाही

केडगाव उपनगरामध्ये पक्षीय राजकारण जोरात चालू असते. त्यातून अनेक घटना या भागात घडल्या आहेत. या उपनगरातील शिवाजीनगर, भूषणनगर, वैष्णवनगर आदी भागांचे प्रतिनिधीत्व करणारे नगरसेवक कधीच या भागात फिरकले नाही. निवडणुका आल्या की ही मंडळी हात जोडून मत मागायला येतात. कामे देखील झाली नाही.
– पार्थ कुलकर्णी, शिवाजीनगर


(संकलन- प्रल्हाद एडके, सागर गोरखे, गणेश बोरुडे, वेदकुमार कुलकर्णी)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)