नागराज मंजुळेंच्या ‘नाळ’चा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई – सैराट आणि फँड्री चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या अभिनयातील पदार्पण असलेल्या ‘नाळ’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला. चित्रपटाचा ट्रेलरला सोशल माध्यमातून चांगलीच दाद मिळत आहे. चित्रपटात आई आणि तिच्या बाळाचे नाते प्रेक्षकांना त्यांच्या लहानपणीचा अनुभव आठवण करून देते. चिमुरड्या चैत्याच्या भावविश्वातून हा सिनेमा उलगडणार असल्याचे ट्रेलरमधून दिसते.


नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओ यांच्या ‘आटपाट’ निर्मिती संस्थेचा ‘नाळ’ हा सिनेमा 16 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तसेच प्रसिद्ध अभिनेत्री देविका दफ्तरदारही महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारत आहे. छायाचित्रण-दिग्दर्शनासोबत कथा-पटकथेची जबाबदारी सुधाकर रेड्डी यक्कंटी यांनी उचलली आहे. तर संवाद लेखण नागराज मंजुळें केले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)