अरणगावच्या सरपंच पतीची झेडपीत अधिकाऱ्यांना अरेरावी

नगर – चुकीच्या पद्धतीने केलेल्या निविदा प्रक्रियेबाबत होणाऱ्या सुनावणीत संबंधित ठेकेदाराची तक्रार फेटाळून सरपंचांनी मान्य केलेल्या ठेकेदारालाच काम देण्यासाठी आता थेट सरपंच पतीच अधिकाऱ्यांना दमबाजी करीत असल्याचा प्रकार आज जिल्हा परिषदेत घडला. विशेष म्हणजे पत्रकारांसमोर अरणगावच्या सरपंच पतीने अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आरेरावी करून सुनावणीत आपल्या बाजूने निर्णय देण्याचा आग्रह धरीत त्यांना दमबाजी केली.

अरणगाव ग्रामपंचायतीमधील विविध विकास कामांसाठी नुकतीच निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. ऑनलाईन निविदा स्वीकारण्यात आल्यानंतर त्या कामांची अनामत रकम देखील ऑनलाईन स्वीकारणे गरजेचे आहे. परंतू ज्या ठेकेदाराने विकास कामांसाठी निविदा दाखल केली. त्याचा अनामत रकमेचा डीडी घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्या ठेकेदाराने समक्ष डीडी स्वीकारला जात नसल्याने ऑनलाईन दाखल केला. परंतू तेही ग्रामपंचायतीने स्वीकारले नाही. त्यामुळे या ठेकेदाराने जिल्हा परिषदेत याबाबत तक्रार दाखल केली. या तक्रारीवर उद्या (मंगळवारी) सुनावणी होणार आहे.

-Ads-

त्या पार्श्‍वभूमिवर अरणगावचे सरपंच पती आज जिल्हा परिषदेत थेट अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा दालनात आला. त्याने संबंधित ठेकेदाराविरोधात वक्‍तव्य सुरू केले. अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करून कायदेशिर बाबी सांगितल्या. परंतू त्या सरपंच पती ठेकेदार चुकीचा असून त्याला काम न देता दुसऱ्याला कामे देण्याचा अधिकार सरपंचाचा असून जर सरपंचाच्या विरोधात निर्णय घेतला तर सरपंच जिल्हा परिषदेत आत्महत्या करतील.

तसेच ग्रामपंचायतीचे 11 सदस्य राजीनामे देतील. असा दम देत त्याने तुम्ही ठेकेदाराची बाजू घेत असल्याचा आरोप केला. सरपंचाच्या मर्जीनुसार काम झाले नाही. ते योग्य होणार नाही असे बोलून तो निघून गेला. त्यामुळे आता ग्रामपंचायतस्तरावर चालणाऱ्या विकास कामांची काय अवस्था आहे, हे चित्र समोर आले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)