‘झेडपी’च्या मालमत्तेवर टाच

तहसीलदारांच्या आदेशानुसार २७ सप्टेंबरला होणार लिलाव; सर्वसाधारण सभेत उमटले पडसाद ; पदाधिकाऱ्यांसह सदस्यांची उडाली धांदल  

सभेत झळकला दैनिक प्रभात

‘झेडपीच्या स्वनिधीतून परस्पर जलसंपदाची भरती!’ या शीषर्काचे वृत्त दैनिक प्रभातमध्ये आज प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेऊन सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी थेट जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दैनिक प्रभातचा अंक झळकावला. पाटबंधारे विभागाकडून पाणीपट्टीच्या 20 टक्‍के हिस्सा जिल्हा परिषदेला मिळावा, म्हणून काय प्रयत्न झाले, असा सवाल त्यांनी केला. अध्यक्ष विखे व मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने यांनी, “आपण पाटंबधारे अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली असून त्यांच्याकडे निधी देण्याची मागणी केली आहे. त्यांनी हा निधी देण्याचे मान्य केले,’ असे सांगितले.

नगर – मुद्रणालयाच्या कर्मचाऱ्यांची जिल्हा परिषदेकडे असलेली देणी, थकित रक्कम वसूल करण्यासाठी शहरातील लालटाकी भागातील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या 24 हजार चौरस मीटर स्थावर मालमत्तेचा येत्या 27 सप्टेंबर रोजी लिलाव करण्याचे आदेश तहसीलदारांनी काढण्यानंतर त्याचे पडसाद आज झालेल्या सर्वसाधारण सभेत उमटले.

या आदेशामुळे पदाधिकाऱ्यांसह सदस्यांची चांगलीच धांदल उडाली. काहीही करा; पण एवढ्या मोठ्या जागेचा लिलाव होता कामा नये, यातून जिल्हा परिषदेची बदनामी झाली. याला जबाबदार असलेल्या मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. मुद्रणालयाच्या कर्मचाऱ्यांबरोबर चर्चा करण्याचे या बैठकीत ठरले.

जिल्हा परिषदेच्या मालकीच्या मुद्रणालयाचा वाद अनेक वर्षापासूनच आहे. यापूर्वीच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांना तो सोडवण्यात अपयश आले आहे. हा वाद न्यायालयात गेल्याने न्यायालयाने जिल्हा परिषदेच्या मालमत्तेवरच टाच आणली आहे. या कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी यापूर्वी लालटाकी येथील अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाची जागा जप्त करण्याची नोटीस बजावली होती; परंतु अधिकाऱ्यांची ते गांभीर्याने घेतले नाही.

अर्जुन घाडगे (6 लाख 15 हजार 578), प्रभावती काळदाते (3 लाख 91 हजार 261), अनंत बिडवे (9 लाख 1 हजार 751) जनार्दन बडे (9 लाख 1 हजार 751), भाऊसाहेब मार्तड लांडगे (9 लाख 1 हजार 751) भगवन देवकर (9 लाख 1 हजार 751) खुदाबक्ष शेख (6 लाख 15 हजार 578) आदिनाथ पागिरे (6 लाख 15 हजार 578) या सर्वांची मूळ रक्कम 12 टक्‍के व्याजासह वसुलीसाठी नगर शहरातील गट क्रमांक 6999 चे 24 हजार चौरस मीटर स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे.

या मालमत्तेचा येत्या 27 सप्टेंबर रोजी लिलाव करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आजच्या सभेत संदेश कार्ले यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांना जबाबदार धरले.

त्यांच्यामुळेच आज ही वेळ आली असून त्यांनी कर्तव्यात कसून केल्याचा फटका जिल्हा परिषदेला बसला आहे. राजेश परजणे, सुनील गडाख, माधवराव लामखडे यांनी या विषयावर आक्रमकपणे प्रशासनाचे वाभाडे काढले. अखेर अध्यक्ष शालिनी विखे यांनी कर्मचाऱ्यांबरोबर चर्चा करून मार्ग काढण्याची सूचना केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)