‘भाऊबीज’ प्रकल्पांकडेच पडून

अंगणवाडी सेविकांच्या दिवाळीचा झेडपीला विसर : साडीचे पैसे देखील रखडले

आज भाऊबीज मिळणार का?

अंगणवाडीसेविका व मदतनीसांच्या खात्यावर भाऊबीज 2 हजार व साडीचे साडेआठशे रुपये उद्या (सोमवारी) त्यांच्या खात्यावर वर्ग होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रकल्पांकडे महिन्याभरापूर्वी वर्ग झालेला निधी दोन ते तीन दिवसात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणे अपेक्षित आहे. परंतू अधिकाऱ्यांकडून झालेल्या चालढकलपणा कोण जबाबदार आहे. हे स्पष्ट होणे आवश्‍यक आहे. बॅंकांमधील गेल्या आठवड्याभरातील गर्दी पाहता उद्या ही रकम वर्ग होण्याची शक्‍यता धुसर दिसत आहे.

नगर – दिवाळीपूर्वी अंगणवाडीसेविका व मदतनीसांना 2 हजार रुपयेप्रमाणे शासनाकडून “भाऊबीज’ व साडीचे साडेआठशे रुपये निधी देण्यात येतो. त्यानुसार नगर जिल्ह्यातील अंगणवाडीसेविकांसाठी भाऊबीज व साडीची रकम गेल्या महिन्याभरापूर्वीच आली असतांनाही ती देण्यास प्रकल्पाधिकाऱ्यांकडून टाळाटाळ करण्यात आली आहे. 8 ऑक्‍टोबरला प्रकल्प कार्यालयात ही रकम वर्ग करण्यात आली असतांनाही ती अंगणवाडीसेविकांच्या खात्यात अद्यापही वर्ग झालेली नाही. लक्ष्मीपूजन दोन दिवसांवर आले असतांनाही अजूनही भाऊबीज व साडीची रकम अंगणवाडीसेविकांना न मिळाल्याने नाराजी पसरली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाला याचा विसर पडला आहे. दरम्यान, याबाबत चौकशी केली असता, सोमवारी सकाळी भाऊबीज व साडीची रकम वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती अंगणवाडीसेविका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. 1 ऑक्‍टोबरला अर्थ विभागाकडून अंगणवाडीसेविकाच्या भाऊबीज, साडीच्या रकमेसह बचत गटांचे रखडलेले सहा महिन्यांची बिलांची रकम महिला व बालकल्याण विभागाकडे वर्ग करण्यात आली होती. त्यानंतर या विभागाने दि. 5 ऑक्‍टोबर रोजी संबंधित जिल्हा परिषदांकडे ती वर्ग केली.

नगर जिल्हा परिषदेकडे ही रकम उपलब्ध होताच. त्यांनी 8 ऑक्‍टोबर रोजी जिल्ह्यातील 21 एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे वर्ग केली. प्रकल्पांतर्गत असलेल्या अंगणवाड्यासाठी आवश्‍यक तो निधी तसेच भाऊबीज व साडीची रकम जिल्हा परिषदस्तरावर वितरित करण्यात आली. अंगणवाडीसेविका व मदतनीस यांना प्रत्येकी 2 हजार भाऊबीज व साडीचे साडेआठशे रुपये हे लगेच त्यांच्या खात्यावर प्रकल्प कार्यालयाकडून टाकणे आवश्‍यक होते. परंतू गेल्या महिन्याभरापासून ही रकम प्रकल्प कार्यालयाच्या खात्यांवर पडून आहेत.

विशेष म्हणजे याबाबत अंगणवाडीसेविकांनी देखील ओरड केली नाही. परंतू आता भाऊबीज मिळण्यास उशीर झाल्याने काही अंगणवाडीसेविका संघटना बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर महिला व बालकल्याण आयुक्‍तांकडे तक्रार करणार आहेत. प्रकल्प कार्यालयात 8 ऑक्‍टोबरला निधी वितरित होवून देखील तो अंगणवाडीसेविका व मदतनीस यांच्या खात्यावर वर्ग का झाला नाही. याचे कारण स्पष्ट होत नाही. प्रकल्प कार्यालयातील लिपिकांसह प्रकल्पाधिकाऱ्यांकडून टाळाटाळ झाल्याचे उघड होत आहे. यावरून महिला व बालकल्याण विभागाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे.

सुमारे 14 कोटीच्यावर रकम जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांना वितरित करण्यात आली आहे. त्याबरोबर अंगणवाड्यांमधील बालकांना पुरविण्यात येणाऱ्या आहार तयार करणाऱ्या महिला बचत गटांची बिले गेल्या सात महिन्यांपासून रखडली आहेत. मे महिन्यापासून ते ऑक्‍टोबरपर्यंत बिल अद्यापही देण्यात आली नाही. विशेष म्हणजे महिला व बालकल्याण विभागाने भाऊबीज व साडीच्या रकमेबरोबरच बचत गटांची बिले देखील पाठविली आहेत. जिल्हा परिषदस्तरावरील या बिलांच्या रक्‍कमा देखील प्रकल्पांना वितरित करण्यात आल्या आहेत. असे असतांना त्यांना ही अद्याप देखील आलेली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)