झेडपीत ‘स्व’ कल्याणाचा नवा पायंडा!

एका पदाधिकाऱ्याच्या टक्‍केवारीची खुलेआम चर्चा

नगर – विविध समाजघटकांच्या विकासाच्या विविध योजना शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येतात. त्यासाठी दरवर्षी कोट्यवधीचा निधी उपलब्ध होतो. अटी व निकषानुसार ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी थेट निधी दिला जात असतो. नगर जिल्हा परिषदेत गेल्या वर्षभरापासून वेगळात पायंडा पाडण्यात आल्याने सरपंच व ग्रामसेवक हैराण झाले आहेत. निधीचे मोठे आकडे सांगून टक्‍केवारीची अपेक्षा केली जात असल्याने नाइलाजाने अपेक्षांची पूर्ती करण्याची वेळ सरपंच व ग्रामसेवकांवर आली आहे. या नव्या पायंडामुळे अधिकाऱ्यांसह पंचायत समितीचे अनेक सभापतीदेखील अवाक्‌ झाले आहेत.

मागास घटकांना मूलभूत सेवा व सुविधा मिळाव्यात, म्हणून 1975 पासून योजना राबविण्यात येत आहेत. मध्यतंरी या योजनेचे नाव बदलून ती प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात झाली. गेल्या पाच वर्षांपासून योजना राबविण्यासाठी देण्यात येणाऱ्या निधीमध्येदेखील मोठी वाढ करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांत या योजनेसाठी तब्बल अडीशे कोटींहून अधिक निधी उपलब्ध झाला. लोकसंख्या हा या योजनेचा मोठा निकष असून त्यानुसार ग्रामपंचायतींना त्या घटकांच्या विकासासाठी निधी देण्यात येतो.

जिल्हा परिषदेकडे हा निधी आल्यानंतर तो पंचायत समितीकडे वर्ग करण्यात येतो. त्यानंतर संबंधित निवड झालेल्या ग्रामपंचायतीला विकासकामांसाठी थेट निधी देण्याची परंपरा आहे; पण गेल्या वर्षभरापासून स्वकल्याणासाठी टक्‍केवारीची अपेक्षा केली जात आहे. ही अपेक्षापूर्ती केल्यानंतर कामे देण्याचा नवा पायंडा एका पदाधिकाऱ्याने पाडला आहे. ज्यांना मंजुरीचे अधिकार नाहीत, त्यांच्याकडून अपेक्षा केल्या जात असल्याने सध्या जिल्हा परिषदेतील संबंधित विभागाचे अधिकारी अवाक्‌ झाले आहेत. विशेष म्हणजे पंचायत समितीच्या सभापतींना ही गोष्ट खटकली आहे.

त्यांच्यापर्यंत गावच्या सरपंचासह ग्रामसेवकांनी तक्रारी केल्या आहेत; पण त्याला कोण वेसन घालणार, असा प्रश्‍न पडला आहे. सध्या तरी जिल्हा परिषद वर्तूळात एका पदाधिकाऱ्याच्या टक्‍केवारीची जोरादार चर्चा होत आहे. त्यांच्याकडून कामे मंजूर होण्यापूर्वीच अपेक्षांची पूर्तता करण्यात आली आहे. त्यामुळे आता अधिकाऱ्यांनी ही कामे मंजूर केली नाही, तर त्यांची अडचण होण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)