युवक कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सत्यजित तांबे यांची निवड

संगमनेर – प्रदेश युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी सत्यजित तांबे सर्वाधिक मते मिळवून विजयी झाले. त्याचबरोबर आमदार अमित झनक व कुणाल राऊत यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. साठ युवकांची प्रदेश कार्यकारिणीदेखील या निवडणुकीच्या माध्यमातून तयार झाली आहे.

नागपूर येथे आज युवक कॉंग्रेसच्या निवडीचा निकाल होता. तांबे यांना 70 हजार 189 मते मिळाल्याने ते प्रदेशाध्यक्ष म्हणून विजयी झाले. आमदार झनक 32 हजार 999 मते, तर कुणाल राऊत 7 हजार 744 मते मिळवून उपाध्यक्ष झाले. तांबे हे 37 हजार 190 चे मताधिक्‍य घेऊन निवडून आले. तांबे यांच्या निवडीने युवक कॉंग्रेसमध्ये चैतन्य पसरले आहे. तांबे यांनी यापूर्वी दोन वेळा नगर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केले आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी 2014 मध्ये कॉंग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. गेल्या पंधरा वर्षांपासून एनएसयुआय व युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठे संघटन व पक्षबांधणी त्यांनी केली आहे. अभ्यासू, आक्रमक आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी नाळ जोडलेला कॉंग्रेसमधील युवानेता अशी त्यांची ओळख आहे.

पक्षातील सर्व नेत्यांनी मला मदत केल्याने मी विजय प्राप्त करू शकलो. 2019 च्या निवडणुकीचे आव्हान कॉंग्रेससमोर आहे. सर्वसामन्य युवकांची एक फळी कॉंग्रेससाठी तयार करण्याचे काम मी करणार आहे. खासदार राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी आम्ही येत्या काळात काम करणार आहे.”
-सत्यजित तांबे, प्रदेशाध्यक्ष युवक कॉंग्रेस

माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे ते भाचे आहेत. कॉंग्रेसमधील गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या नेत्यांचा व कार्यकर्त्यांसोबत त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विश्वासातील युवा नेता अशीदेखील त्यांची ओळख आहे. या अगोदर दोन वेळा त्यांनी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्षपद भूषविले आहे. नागरी विकास, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि युवक सशक्तीकरण या विषयावर त्यांचा विशेष अभ्यास आहे. तांबे यांच्या रूपाने सर्वांना सोबत घेऊन भाजप सरकार विरोधात संघर्ष करू शकणारा आश्‍वासक चेहरा युवक कॉंग्रेसला मिळाल्याचे बोलले जाते आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)