युवक कॉंग्रेस पक्षांतर्गत निवडणूक ‘हायटेक’

ऍपद्वारे होणार मतदान प्रक्रिया 9, 10, 11 सप्टेंबरला मतदान 

नगर – युवक कॉंग्रेसच्या पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांच्या निवडणूक हायटेक पद्धतीने होत आहे. मतदारांना एका ऍपद्वारे मतदान करावे लागणार आहे. युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, प्रदेश महासचिव, जिल्हाध्यक्ष, जिल्हा महासचिव व विधानसभा अध्यक्ष या पदांसाठी येत्या 9, 10 व 11 सप्टेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

युवक कॉंग्रेसने पूर्वतयारी सुरू केली असून, गेल्या सहा महिन्यांपासूनच युवक कॉंग्रेसची सदस्य नोंदणी केली आहे. युवक कॉंग्रेस सदस्यांची नोंदणी केल्यानंतर आता विविध पदांसाठी हे सदस्य 9, 10 व 11 सप्टेंबर रोजी मतदान करणार आहेत. प्रदेशाध्यक्षपदासाठी आ. अमित झनक, सत्यजित तांबे व कुणाल राऊत रिंगणात आहेत, तर प्रदेश महासचिव पदासाठी सागर देवेंद्र कावरे, अभिषेक भरगड, सागर देशमुख व श्रेयश इंगोले उभे आहेत.

यासोबतच जिल्हाध्यक्षपदासाठी आकाश जगताप, गणेश जाधव, कुलदिप भिंगारदिवे, सागर भिंगारदिवे रिंगणात उभे आहेत. सत्यजित तांबे हे नगर जिल्ह्यतील आहे. जिल्हाध्यक्षपदासाठी चुरस आहे. यावेळी जिल्हाध्यक्षपद अनुसूचित जाती राखीव असल्याने अनेक दिग्गजांची कोंडी झाली आहे. जिल्हाध्यक्षची निवड बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला. परंतू त्यात जिल्ह्यातील नेत्यांना यश आले नाही. त्यामुळे आता जिल्हाध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे.

मतदानासाठी एक मिनीट नऊ सेकंद वेळ

युवक कॉंग्रेस सदस्यांना मतदान करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा स्तरावर एक टॅब ठेवण्यात येणार आहे. या टॅबमधील एका ऍपद्वारे प्रदेशाध्यक्ष, प्रदेश महासचिव, जिल्हाध्यक्ष, जिल्हा महासचिव व विधानसभा अध्यक्ष या पाच उमेदवारांना मतदान करावे लागणार आहे. यासाठी या ऍप’द्वारे पाच उमेदवारांना मतदान करण्यासाठी एक मिनीट नऊ सेकंद वेळ मिळणार आहे. या पाच उमेदवारांचे नाव व चिन्ह दिलेल्या ठिकाणावर क्‍लिक करून मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

जिल्ह्यात 22 पदाधिकाऱ्यांची टीम

राज्यात एकाच वेळी म्हणजेच 9, 10 व 11 सप्टेंबर रोजी ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी उत्तरांचल, उत्तर प्रदेश, केरळ, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा येथून कॉंग्रेसचे पदाधिकारी राज्यात दाखल होणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात 22 तज्ज्ञ पदाधिकाऱ्यांची टीम उपस्थित राहणार आहे. ही टीम तीन दिवस निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जिल्हा स्तरावर तळ ठोकून राहणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)