युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्षपदासाठी चुरस

राखीव जागेमुळे दिग्गजांची कोंडी;  एकमतासाठी श्रेष्ठींकडून प्रयत्न

नगर – युवक कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. या पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी चार जणांनी अर्ज दाखल केले आहे. ही निवड बिनविरोध करण्याचा प्रयत्न असून त्यादृष्टीने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व आमदार बाळासाहेब थोरात यांच्या एकमत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान प्रदेशाध्यक्षपदासाठी सत्यजित तांबे यांनी अर्ज दाखल केला आहे.

युवक कॉंग्रेसची निवडणुकी प्रक्रिया सुरू झाली आहे. यावेळी जिल्हाध्यक्षपद अनुसूचित जाती राखीव असल्याने अनेक दिग्गजांची कोंडी झाली आहे. आज यापदासाठी आकाश जगताप, गणेश जाधव, कुलदिप भिंगारदिवे, सागर भिंगारदिवे यांनी अर्ज दाखल केला आहे. उद्या या उमेदवारांना चिन्ह वाटप होणार असून त्यानंतर निवडणूक होणार आहे. ही निवडणूक होवून नये म्हणून एकमत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

ना. विखे व आ. थोरात गटात एकमतासाठी पक्षश्रेष्ठींकडून प्रयत्न होत आहे. अर्थात कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्षपदासह महिला जिल्हाध्यक्षपद देखील ना.विखे गटाकडे आहे. त्यामुळे युवकचे जिल्हाध्यक्षपद आ. थोरात गटाकडे देण्यात यावे असा प्रयत्न होत आहे. अर्थात जिल्ह्यातील सर्वच पक्षाची पदे आपल्याकडे ठेवण्याचा ना. विखे यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे यापदासाठी एकमत होण्याची शक्‍यता दिसत नाही. परिणामी निवडणुक होण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)