‘युवा माहिती दूत’ उपक्रमाच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत थेट

पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते उपक्रमाच्या लोगोचे अनावरण

नगर – माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या “युवा माहिती दूत’ या उपक्रमाचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. विविध शाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयातील युवकांमार्फत शासकीय योजनांची माहिती प्रस्तावित लाभार्थ्यांपर्यंत थेटपणे पोहचविणे हे “युवा माहिती दूत’ उपक्रमाचे वैशिष्ट्‌य आहे. प्रा. शिंदे यांनी यावेळी तयार करण्यात आलेल्या लोगोचे अनावरण केले.

-Ads-

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने “युवा माहिती दूत’ हा उपक्रम हाती घेतला आहे. शासकीय विश्रामगृह येथे कार्यक्रम पार पडला. जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण, माहिती सहायक गणेश फुंदे यांच्यासह महाविद्यालयीन शिक्षकांची यावेळी उपस्थिती होती.

शिवाय, शासकीय योजनांचे बहुतांश प्रस्तावित लाभार्थी हे अर्धशिक्षित, दारिद्रयरेषेखालील आणि दुर्गम भागातील असल्याने वृत्तपत्रे, दूरचित्रवाणीसंच अथवा रेडिओ ही माध्यमे ते वापरतात असे नाही. लाभार्थ्यांपर्यंत न पोहचणाऱ्या शासकीय योजना दुहेरी संवादातून त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी राज्यातील समाजकार्याची आवड असलेल्या उत्साही तरूण वर्गाचे सहाय्य घेण्याचा “युवा माहिती दूत’ या उपक्रमाचा महत्त्वाचा उद्देश आहे.

उपक्रमात एक लाख युवकांचा होणार सहभाग

राज्यात 6 हजारपेक्षा जास्त महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयामध्ये एकूण सुमारे 23 लाख पेक्षा जास्त विद्यार्थी शिकत आहेत. त्यापैकी किमान 5 ते 7 टक्के विद्यार्थी म्हणजे किमान एक लाख युवक या उपक्रमात सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. गुगल प्ले स्टोअरवरुन विद्यार्थ्यांना हे ऍप डाऊनलोड करुन घेता येणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)