गोळीबार झालेल्या तरुणाने केली आत्महत्या

file photo

संगमनेर – प्रेम प्रकरणातून दीड वर्षांपूर्वी गोळीबार झालेल्या एका तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील मालदाड रस्त्यावर घडली. दीपक रंगनाथ दुसाने (वय 22 रा. मालदाड रोड, दत्त नगर घुलेवाडी ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, की दीड वर्षांपूर्वी संगमनेर महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूस एकता चौकात मुलीच्या प्रेम प्रकरणाच्या कारणावरून दुसाने याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्या प्रकरणात त्याला अटकही केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानंतर तो जामिनावर सुटला होता. दीपकने आज शुक्रवारी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली; मात्र त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या खबरीवरून शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)