थकित वेतनासाठी कामगारांचे धरणे

नगर  – गेल्या 25 ते 30 वर्षांपासून एमआयडीसीतील फोर्स अप्लायन्स प्रा. लि. कंपनीत कामगार काम करीत आहेत. मात्र, गेल्या सात महिन्यापासून कंपनीतील कामगारांना पगार देण्यात आलेले नाही. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. मध्यंतरीच्या काळात कंपनी बंद करण्याबाबत कामगारांना नोटीस देण्यात आली होती. यावेळी सर्व कामगारांनी विभाग कामगार कार्यालयात धाव घेतली. त्यानंतर कंपनी यांच्यात समेट घडवून कामगारांची देणी देण्याचे ठरले. परंतु कंपनीने पुन्हा कामगारांना कंपनी सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. कंपनीच्या या दुतोंडीपणामुळे कामगारांचे देणे टाळले जात आहे.

या प्रश्‍नी नगर जिल्हा मजदूर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यानंतर कामगार आयुक्तांची कंपनी प्रशासनाशी दोनदा बैठकीचे आयोजन केले होते. परंतु कंपनीकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कामगार सैरभैर झाले आहेत. कामगारांनी नगर जिल्हा मजदूर सेनेच्या माध्यमातून एमआयडीसीतील कंपनीसमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात 45 कामगार अध्यक्ष बाबूशेठ टायरवाले यांच्या मार्गदर्शनाखाली 24 तास धरणे धरणार आहेत.

या धरणे आंदोलनात अध्यक्ष बाबूशेठ टायरवाले, बी. एस. धनवटे, त. आर. झावरे, एस. पावले, ए. पी. पाटील, आर. एम. कुदळे, पी. एम. डोमल, ए. व्ही. पानसरे, एस. पी. राजूरकर, एस. पी. मुनोत, बी. एस. पवार, एस. डी. क्षीरसागर, एन. एस. रोकडे, अलका सोनवणे, सुनीता चक्रे, शैला रासने, सपना भिंगारदिवे, बिजला मुंडे, मीना रोकडे, आरती बागडे, विशाला घोडके आदी सहभागी झाले आहेत.

यावेळी नगर जिल्हा मजदूर सेनेचे अध्यक्ष बाबूशेठ टायरवाले म्हणाले की, फोर्स अप्लायन्स प्रा. लि. कंपनीत महिला कामगार मोठ्या संख्येने आहेत. कंपनीने गेल्या दीड महिन्यांपासून लाईट बंद केली असली, तरी सर्व कामगार व्यवस्थापनाला सहकार्य करीत आहेत. तरीही कंपनीने याची दखल घेतलेली नाही. कंपनीत काम नाही, यात कामगारांची काय चूक आहे. वारंवार या सर्व गोष्टींकडे कामगार आयुक्तांकडे तक्रारी केल्या असून, त्याकडे त्यांनी लक्ष दिलेले नाही, असे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)