नगरमधील दरेवाडीत महिलांमध्ये राडा

चौघींची एकीला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण

भिंगार  – दरेवाडी (ता. नगर) येथे महिलांमध्ये लाथाबुक्‍क्‍यांनी चांगली मारमारी झाली. महिला एकमेकांच्या नातेवाईक असून, दिवसभर या महिला राड्याची चर्चा होती. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात या मारामारीप्रकरणी चार महिलांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. रुपा रवी चव्हाण (वय 38, रा. स्वामी सर्थ अपार्टमेंट, दरेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. ज्योती अनिल बहोत, रेखा चव्हाण, राखी संजय बहोत व ताराबाई गोहेर (सर्व रा. नाशिक, सध्या रा. दरेवाडी) या चौघा महिलांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

रुपा आणि या महिलांमध्ये मागील भांडणावरून वाद होते. या भांडणाचे रुपांतर मारामारीत झाले. चौघा महिलांनी रुपा यांच्या घरात घुसून त्यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. केस ओढून त्यांना फरफटले. घरातील सामानाची तोडफोड केली. रुपा यांना मारहाण करताना त्यांच्या गळ्यातील आठ हजार रुपयांची सोन्याची पोत कोणीतरी काढून घेतली. या मारामारीमुळे स्वामी समर्थ अपार्टमेंटमध्ये एकच गोंधळ उडाला होता.

महिलांची मारामारी सोडविण्यासाठी कोणीही पुढे येईना. लाथाबुक्‍क्‍यांची मार लागल्याने रुपा या काही काळ निपचित पडून राहिल्या. या मारहाणीमुळे त्या जखमी झाल्या होत्या. मारहाणीनंतर या चौघी महिला तेथून निघून गेल्या. यानंतर रुपा यांनी घरच्यांच्या मदतीने भिंगार कॅम्प पोलिसांकडे तक्रार नोंदवली. दरम्यान, महिलांच्या या राड्याची दरेवाडी जोरदार चर्चा रंगली आहे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)