उपनगरांचा पाणीपुरवठा विस्कळीत

नगर – मुळानगर, विळद पंपिंग स्टेशनचा वीज वितरण कंपनीकडून वीजपुरवठा तांत्रिक बिघाडामुळे खंडित झाला आहे. त्याचा परिणाम पाणी उपशावर झाला आहे. खंडित झालेला वीजपुरवठा दुपारी दीड वाजल्यानंतर सुरू झाला. पाणी उपसा उशिरा सुरू झाला आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी दुपारनंतरचा वेळ लागणार आहे. त्यामुळे सावेडी उपनगराचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

बोल्हेगाव, नागापूर, सावेडी, लक्ष्मीनगर, निर्मलनगर, स्टेशन रोड, सारसनगर, मुकुंदनगर, केडगाव या भागाला बुधवारी आज पाणीपुरवठा झाला नाही.

-Ads-

या भागास उद्या (गुरूवारी) पाणीपुरवठा होईल, असे सांगण्यात आले आहे. गुरूवारी रोटेशननुसार पाणीपुरवठा सुरू होईल. शहराच्या मध्यवर्ती भागात मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, माळीवाडा, कोठी या भागाला उशिरा पण कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)