श्री विशाल गणेशाच्या दर्शनाने प्रभावित झालो -हनुमंत गायकवाड

नगर – नगरवासियांचे -ग्रामदैवत श्री विशाल गणपतीच्या दर्शनाने माझे मन प्रफुल्लीत व आनंदित झाले ,बऱ्याच वर्षांपासून श्री विशाल गणपतीचे दर्शन घ्यावे हि इचछा आज पूर्ण झाली असल्याचे प्रतिपादन पुण्याच्या व्ही .जी. इंडियाटीप कंपनी चे अध्यक्ष प्रथितयश उद्योगपती हनुमंतराव गायकवाड यांनी केले.

बी.व्ही .जी. इंडिया टीप हि कंपनीची सम्पूर्ण भारतात 108 नंबरवर गरजेच्या वेळी कॉल केल्यास तातडीने अम्बुलन्स पुरवून वैधकीय सेवा उपलबध करून देते याच बरोबर कृषी उत्पादनासाठी हर्बल उत्पादने शेतकऱ्यांना पुरविते,मध्य प्रदेशात कायदा व सुवयवस्था अबाधित राहण्यासाठी सुमारे 1000 वाहनांची सेवा देते .संपूर्ण भारतात 80 हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या मार्फत हि सेवा पुरविली जाते महत्वाच्या अशा पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भुवन ,सुप्रीम कोर्ट येथे देखील; हि सेवा पुरविली जाते असे अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड यांनी सांगितले .

श्री विशाल गणेश मंदिरात आल्यानंतर त्यांनी मंदिर माहात्म्य मुख्यविश्‍वस्त अभय आगरकर , अशोकराव कानडे यांचे कडून सविस्तर माहिती घेतली रोज होणाऱ्या महाआरतीचा त्यांनी लाभ घेतला.त्यांच्या हस्ते श्री विशाल गणेशाची आरती करण्यात आली . श्री माळीवाडा देवस्थान ट्रस्टच्या वतीने गायकवाड यांचा शाल , श्रीफळ व श्री विशाल गणपतीची प्रतिमा देऊन श्री आगरकर व कानडे यांनी त्यांचा सन्मान केला यावेळी कंपनीच्या नाशिक विभागाचे सर्कल प्रमुख बाळासाहेब कंक्राळे व संभाजीराव गायकवाड .आदी मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)