गणेशोत्सवात अंजली नृत्यालयाकडून विशाल गणपती मंदिरात नृत्यसेवा

शुक्रवारी कार्यक्रमाचे आयोजन : 100 विद्यार्थिंनीचा सहभाग

नगर – गणेश उत्सवामध्ये ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत नगरच्या प्रसिद्ध अंजली नृत्यालयाकडून नृत्य सेवा सादर करण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता. 14) सकाळी दहा वाजता हा कार्यकर्रम होणार आहे. या सेवेत 100 हून अधिक विद्यार्थ्यांनी एकाचवेळी भरतनाट्यम्‌ या शास्त्रीय नृत्य सादर करतील, अशी माहिती सुरेखा डावरे यांनी दिली.

या भरतनाट्यम्‌ सादरीकरणामध्ये सुखकर्ता दुखहर्ता, या पारंपारिक आरतीने सुरुवात करुन प्रणम्य शिरसां देवम्य, गणेश कौतुकम्य, शिवकिर्तन, तिल्लाणा श्‍लोकमाला, महिशासुर मर्दिणी स्त्युती अशा विविध नृत्य प्रकाराचा यात समावेश आहे. या सदरीकरणाची जय्यत तयारी सुरू असून, रंगीत तालीमही झाली आहे.

यापूर्वीही अंजली नेत्रालयाच्या 55 विद्यार्थ्यांनी कोल्हापूर येथे झालेल्या विश्‍वविक्रम गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड या कार्यक्रमात सहभाग नोंदविला आहे.तरी सर्व नागरिकांनी श्री विशाल गणपती मंदिर येथे होणाऱ्या या अनोख्या नृत्य सादरीकरणाच्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)