नगर – अरणगाव ते वाळकी मार्गावरील बाबुर्डी घुमट (ता. नगर) गावाजवळ बुधवारी सकाळी झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. सोमनाथ धमार्जी परभाने (वय- 4, बाबुर्डी घुमट) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या अपघातानंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी मोटरगाडी पेटवून दिली. जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. या अपघातानंतर गावात तणावाचे वातावरण होते.

सोमनाथ परभाने हे अरणगाव येथून वाळकी गावाकडे जाणाऱ्या मार्गावर बाबुर्डी घुमट गावाजवळ आले होते. परभाने हे दुचाकीवर होते. त्यांच्या दुचाकीला मोटरगाडीची धडक बसली. यात परभाने हे जागीच ठार झाले.याची माहिती गावकऱ्यांना मिळाल्याबरोबर अपघातस्थळी धाव घेतली. गावकरी अपघाताची परिस्थिती पाहून चांगलेच संतप्त झाले. काहींनी रोष व्यक्त करत गाडीवर दगड फेकले. त्यांनी काहींनी गाडी पलटी करून दिली. त्यानंतर काहींनी ही गाडी पेटवून दिली.

या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. अपघाताची माहिती आणि मोटरगाडी पेटविल्याची माहिती नगर तालुका पोलिसांना मिळताच,त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, तणावामुळे मोटरगाडीतील चालक पसार झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर परिस्थिती आटोक्‍यात आली. काही ठिकाणी बळाचा वापर करावा लागला. या अपघातप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात मोटरगाडीच्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)