तोफखान्याला ८६ सीसीटीव्हींची गरज!

-प्रदीप पेंढारे

मोहरम आणि गणेशोत्सव काळातील बंदोबस्ताचा अॅक्शन प्लॅन तयार : १२० जण हद्दपार करणार

नगर – मोहरम आणि गणेश उत्सवाच्या काळात सर्वात संवेदनशील ठिकाणांवर नजर ठेवण्यासाठी तोफखाना पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज आहे. त्यासाठी 86 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे तसा प्रस्ताव देखील सादर केला आहे. पोलीस निरीक्षक संतपराव शिंदे यांनी या माहितीला दुजोरा दिला.

शहर शहराच्या मध्यवर्ती भागात कोतवाली व तोफखाना पोलिसांची हद्द येते. हेच मार्ग मोहरम व गणेश उत्सवाच्या मिरवणुकीचे आहे. हाच भाग अतिशय संवेदनशील आहे. यावर लक्ष ठेवण्यासाठी कितीही पोलीस दल उभे केले, तरी ते कमी पडते. त्यामुळे यावेळी सीसीटीव्ही कॅमेरे ठेवण्याची तजबीज करण्यात येत आहे. तोफखाना पोलिसांनी मिरवणुकीच्या मार्गासह हद्दीत 86 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज व्यक्त केली आहे. शहर पोलीस उपअधीक्षक कार्यालयाकडे तसा प्रस्ताव देखील पाठविला आहे.

कोंड्यामामा चौक, मंगलगेट, दाळमंडई, तेलीखुंट, सर्जेपुरा, नवीपेठ, चौपाटी कारंजा, दिल्ली दरवाजा, प्रोफेसर कॉलनी चौक, पाईपलाइन रोड, विर्सजन स्थळांसह अनेक प्रमुख चौकात या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज व्यक्त करण्यात आली आहे. या दोन्ही उत्सवाच्या काळात तोफखाना पोलिसांनी दहा दिवसांचा ऍक्‍शन प्लॅन तयार केला आहे. या दिवसांमध्ये सुमारे 450 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त राहणार आहे.

प्रस्तावित प्रतिबंधात्मक कारवाई
शांतात भंग करणे : 400
प्रतिंबंधात्मक आदेश : 129
हद्दपार करणे : 100
समज देणे : 200
स्थानबद्ध करणे : 18
दारूतील हद्दपार : 10 Ganeshotsav-2018

मोहरम व गणेश उत्सवातील बंदोबस्ताचा ताण आहे. परंतु सर्वसामान्यांचे रक्षण हे कर्तव्य देखील आहे. यावेळी दोन्ही सण एकत्र आले आहे. समाजविघातक प्रवृत्तींवर नजर आहेच. ही नजर अधिक करडी करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेत आहोत. तसा प्रस्ताव देखील दिला आहे. मोहरम आणि गणेश विसर्जनासाठी अतिरीक्त आणि स्वतंत्र असा ऍक्‍शन प्लॅन तयार केला आहे. -संपतराव शिंदे , पोलीस निरीक्षक, तोफखाना


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)