नगर  – जिल्ह्यात सध्या स्थानिक प्रश्‍नांच्यासंदर्भात राजकीय पक्ष व विविध संघटनेचे कार्यकर्ते यांच्या वतीने उपोषण, मोर्चा, “रास्ता रोको’ इत्यादी प्रकारचे आंदोलनात्मक कार्यक्रम चालू आहेत. तसेच सकल मराठा, धनगर व मुस्लीम समाजाच्या वतीने आंदोलनात्मक कार्यक्रम चालू आहेत. जिल्ह्यात सर्वत्र सण साजरे करण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात महसूलस्थळ सीमेच्या हद्दीत 31 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केला आहे.

जिल्हादंडाधिकारी द्विवेदी यांनी जिल्ह्यातील कोणत्याही इसमास शस्त्रे, काठ्या, तलवारी, बंदुका, भाले, सुरे, अशी कोणतीही हत्यारे अथवा वस्तू बरोबर घेऊन फिरणे मनाई केली आहे.

जिल्हा महसूलस्थळ सीमेच्या हद्दीत 31 ऑगस्टरोजी पर्यंत जारी राहील. या कालावधीत काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्‌भवल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांनी कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्‍ती करण्याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)