तहसील कार्यालयात मराठ्यांची निदर्शने

साखळी पद्धतीचे बेमुदत धरणे : आंदोलनात “एक वार्ड एक गावाचा’ समावेश

नगर – सकल मराठा समाजाने क्रांतिदिनाच्या आंदोलनानंतर आरक्षणासह इतर मागण्यां मान्य होईपर्यंत दि. 10 ऑगस्टपासून साखळी पद्धतीचे बेमुदत धरणे आंदोलन नगर तहसील कार्यालयात सुरू केले आहे. या साखळी उपोषणात “एक वार्ड, एक गाव’ असा समावेश राहणार असल्याची माहिती सकल मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी संजीव भोर, अजय बारस्कर, बाळासाहेब पवार, संजय अनभुले, दिंगबर भोसले, राम पठारे, आशा निंबाळकर, आशा गायकवाड, उषा ओझा, सुनील बोठे, स्वप्नील पाठक, गणेश गोरे, तन्मय गांगर्डे, अच्युत गाडे, प्रमोद भासार, राम झिने, विशाल म्हस्के, वैभव शिंदे, आदिनाथ चंद्रे, बापू भोसले, श्रीपाद दगडे, अनिल शिंदे आदी सकल मराठा बांधव उपस्थित होते.

सकल मराठा क्रांती मोर्चाने क्रांतिदिनी महाराष्ट्र बंदची हाक देत संप पुकारला होता. या संपाला जिल्हाभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले मात्र, जिल्हाभर कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यानंतर मराठा क्रांती मार्चाने जिल्हाभर तहसील कार्यालयावर साखळी पद्धतीचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. नगर तहसील कार्यालयात कालपासून सुरू करण्यात आलेल्या साखळी उपोषणात एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणा देत निदर्शने केली.

मराठा क्रांती मोर्चाने सुरू केलेल्या आंदोलनात “एक वार्ड एक गाव’ अशा पद्धतीने आंदोलनास सुरूवात केली. उद्या या साखळी उपोषणात निंबळक गाव व पाइपलाइन रोड येथील वार्ड नं. 3 सहभागी होणार आहे. त्यानंतर अशाच पद्धतीने तालुक्‍यातील एक गाव एक वार्ड या आंदोलनात सहभागी होणार आहे.

“सकल मराठा समाजाच्या वतीने 10 ऑगस्टपासून साखळी पद्धतीचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. हे आंदोलन आरक्षणासह इतर मागण्यां मान्य होईपर्यंत सुरूच राहणार आहे”.
-संजीव भोर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)