आंतरशालेय नॅशनल टेबल टेनिस स्पर्धेत देव श्रॉफ, गौरवची चमक

इंदौर  – जमनाबाई नरसीच्या देव श्रॉफने चांगली कामगिरी करत इलेव्हन स्पोर्टस आंतरशालेय नॅशनल टेबल टेनिस स्पर्धेतील मुलांच्या ज्युनियर सांघिक गटात उत्तराखंड दून स्कूलवर 3-0 असा विजय मिळवून देण्यात आपले योगदान दिले. तर, भारताचा दुसरा मानांकित (कॅडेट मुले) फादर ऍग्नेल मल्टिपर्पोपज स्कूलच्या गौरव पंचांगमने छाप पाडत मुलांच्या सब- ज्युनियर सांघिक गटात विजय मिळवून दिला.

इंदौर येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या ज्युनियर सांघिक गटात जमनाबाई नरसीला राजवीर शाहने दून स्कूलच्या श्‍यामल सिंघलवर 3-0 (11-7, 11-6, 11-6) असा विजय मिळवला. त्याचा संघसहकारी व भारताचा सहाव्या मानांकित (ज्युनियर मुले) देव श्रॉफने कनिश अग्रवालला 3-0 (11-6, 11-5, 11-3) असे नमविले.तर, राजवीर व देव जोडीने श्‍यामल व आर्यन जोडीवर 11-9, 11-7, 11-8 असा विजय मिळवला.

मुलांच्या सब- ज्युनियर सांघिक गटात फादर ऍग्नेल मल्टिपर्पोज स्कूलच्या नचिकेतो एम.याने जोधामल स्कूल ऑफ जम्मू-काश्‍मिरच्या रोहन लॅंगरवर 3-0 (11-6, 11-0, 11-3) असा विजय मिळवला. एकेरीच्या दुस-या लढतीत गौरव पंचांगमने अरित बारगोत्रवर 3-0 (11-1, 11-6, 11-8) असा विजय नोंदवला. दुहेरीमध्ये गौरवने रोनित अनेगुंडीसोबत खेळताना रोहन व अरितवर जोडीला 3-0 (11-4, 11-3, 11-3 ) असे नमवित पुढची फेरी गाठली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)