स्वच्छता अभियानामुळे शहर विकास

नगर – चार वर्षांपूर्वी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियान राबवून देश स्वच्छ करण्याचा संकल्प केला होता. नगर शहरात 15 दिवस शहरातील सर्व 17 प्रभागांमध्ये हे स्वच्छता अभियान भारतीय जनता पक्ष राबविणार आहे. सर्वांच्या सहभागाने या अभियानामुळे आपले नगर शहर स्वच्छ होऊन पुढे जाणार असल्याचा विश्‍वास शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नगर शहरामध्ये शहर भाजपतर्फे शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळी कापड बाजार, तेलीखुंट, घासगल्ली, माणिकचौक आदि परिसरात विशेष स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ केला. खासदार गांधी यांनी स्व:खर्चाने तातडीने घमेले, फावडे, कुदळ आणुन कोपऱ्या कापऱ्यातील स्वच्छता केली. कापड बाजारचा संपूर्ण रस्ता, शहाजी रोड चौकातील डीपी परिसर, माणिकचौक, सेनापती बापट यांच्या पुतळा व कारंजा परिसर यावेळी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वच्छ केला.

संघटन सरचिटणीस किशोर बोरा, गटनेते सुवेंद्र गांधी, ज्येष्ठ नेते सुनिल रामदासी, नगरसेविका मालन ढोणे, नाना भोरे, जगन्नाथ निंबाळकर, अविनाश साकला आदी आंदोलनात सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)