युवकांनो सामाजिक सलोखा वाढवा

जवळे : सुवर्णयुग तरूण मंडळाकडून पथनाट्यातून समाज प्रबोधन

पाथर्डी – वर्तमानात गंभीर असलेल्या सामाजिक विषयावर समाज प्रबोधन करण्याचे काम पथनाट्यातून होते. ही कौतुकाची गोष्ट आहे. सामाजिक प्रश्‍नांवर गणपती मंडळाने केलेले प्रबोधन समाजात समता व बंधुता प्रस्थापित करण्यासाठी मोलाचे ठरेल. सामाजिक ऋणातुन उतराई होण्यासाठी युवकांनी पुढे येवुन सामाजिक सलोखा वाढावा, यासाठी काम करावे असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांनी केले.

शहरातील सुवर्णयुग तरुण मंडळाची गणेश स्थापना मिरवणूक पोलीस उपविभागीय अधिकारी मंदार जावळे यांच्या हस्ते श्रीची प्रतिष्ठापणा करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे, मंडळाचे मार्गदर्शक राजेंद्र शेवाळे, तहसीलदार नामदेव पाटील, भाजप युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे आदी उपस्थित होते.

सोशल मिडियावरुन पसरणाऱ्या अफवा, आक्षेपार्ह जातीय वादाचे मेसेज त्यातून होणारा तणाव यावर आधारित फेक न्यूज हा विषय घेऊन प्रबोधनपर पथनाट्य, समुद्र मंथन, तांडव नृत्य, गणेशाची जन्म कथा, शिवलीला, सामूहिक नृत्य, बॅण्डपथक, गणेश रथ आदींसह मंडळच्या सदस्यांच्या डोक्‍यावरील सामाजिक संदेश देणारे टोपी, तसेच सोशल मिडियासंबंधी जनजागृती पत्रक मिरवणुकी दरम्यान वितरित करण्यात आले.

शिस्तबंध कार्यकर्ते एका गणवेशात लक्षवेधी ठरली. पथनाट्य, सामूहिक नृत्य पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली. याला सर्वांनीच भरभरून दाद देत उपस्थितांची मने जिंकली. गेल्या अठरा वर्षापासून सुवर्णयुग मंडळ अनेक सामाजिक कार्य गणेश उत्सवासह वर्षभर तालुक्‍यात करत आहे. गणेश उत्सवात स्थापना मिरवणूकीत अनेक वर्षांची परंपरा जपत मंडळाने सामाजिक जान ठेवत पथनाट्याद्वारे चालू घडामोडीवर लोकांमध्ये जनजागृतीचे काम करत आहे याची दखल राज्यशासन, पोलीस विभाग, स्थानिक संस्थानी घेऊन मंडळाला पारितोषिक देऊन सन्मानित केले आहे.

मंडळाचे अध्यक्ष वैभव शेवाळे, राहुल भगत, मोनिष उदबत्ते, सुनिल नितनाथ, संदीप पाणगे, ओम डागा, अविनाश वेदपाठक ह्या मंडळच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पथनाट्यात सहभाग घेतला. नगर येथील सावरा ग्रुपने शंकर-पार्वती, गणेशाची वेशभूषा साकारून सादर केलेले नृत्य अतिशय सुरेख सादर केला. सुमारे वीस कलाकारांनी यात सहभाग घेतला. सुवर्णयुग गणेश उत्सव 2018 चे अध्यक्ष गणेश महालकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)