पारनेर तहसीलवर संविधान बचाओ रॅली

पारनेर : भारतीय संविधान बचाओ रॅली काढून तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.

सुपे – पारनेर तालुका भारिप बहुजन आघाडी (वंचित बहुजन आघाडी) तर्फे ऍड. वाक्षे यांच्या नेतृत्वाखाली पारनेर तहसील कार्यालय येथे भारतीय संविधान बचाओ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्याबाबतचे निवेदन पारनेरचे तहसिलदार गणेश मरकड यांना देण्यात आले. या रॅलीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासुन सुरुवात करण्यात आली. भारतीय संविधान रॅली शिवाजी पेठेतून सरळ कार्टमार्गे तहसील कार्यालयावर नेण्यात आली. यावेळी भारतीय संविधान बचाओच्या घोषणा देण्यात येत होत्या.

या संविधान रॅलीचे तहसील कार्यालय येथे सभेत रुपांतर करण्यात आली. यावेळी भारिप बहुजन आघाडीचे विशाल पवार यांनी संविधान बचाओविषयी सविस्तर माहिती दिली तर, संविधान बचाओसाठी सर्व समाजघटकांनी एक होण्याची नितांत आवश्‍यकता असल्याचे ऍड वाक्षे यांनी सांगितले.

प्रसंगी विशाल पवार, संतोष नगरे, बाळासाहेब कांबळे, रणजित पातारे, माजी सरपंच बाळासाहेब नगरे, रुपेश शिंदे, मिलिंद सोनवणे, किशोर शिंदे, विलास जेकटे, डि. एन. गायकवाड, बाबाजी वाघमारे, आर. एन. गायकवाड, नितीन नगरे, गंगाराम आल्हाट, संतोष बर्डे, किशोर खाडे, पप्पु सुर्यवंशी तसेच तालुक्‍यातील समविचारी संघटना सामील झाल्या होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)