
वन्यप्राण्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी : ग्रामस्थांनी केला वनविभागाकडे पाठपुरावा
सुपे – पारनेर तालुक्यातील लोणी हवेली येथे डोंगर पायथ्याशी असणाऱ्या शेतात रानडुकरांनी शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यामुळे आधीच दुष्काळात होरपळलेला शेतकरी राजा हाता-तोडांशी आलेला घास रानडुकरे व वन्य प्राण्यांनी पाण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या मालाचेच नुकसान केले. त्यामुळे नुकतेच लोणी हवेलीचे माजी सरपंच लहु कोल्हे, उपसरपंच प्रा. संजय कोल्हे, शिक्षक नेते दादा कोल्हे गुरुजी, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव, संभाजी थोरे, बाजीराव दुधाडे, निलेश जगताप, सागर हिंगडे आदींनी वनविभागास निवेदन देऊन पाण्याची व्यवस्था करण्यास सांगितले होते. याबाबत दैनिक ‘प्रभातमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच वनविभाग खडबडून जागे झाले.
नुकताच वनविभागाने डोगराला महादेव मंदिराजवळ वन्य प्राण्यासाठी पानवठे बांधले आहे. मात्र, त्यामध्ये पाण्याची व्यवस्था केली नाही. यासाठी ग्रामस्थांनी वनविभागास निवेदन देऊन पाणी व्यवस्था करण्यास सांगितले.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या निवेदनाची तातडीने दखल घेऊन, तलावात पाण्याची व्यवस्था केली. त्यामुळे आता वन्यप्राणी व रानडुकरे यांना डोंगरावर तलावात पाणी उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नुकसान कमी होऊ शकते, असा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तवला आहे.
वन विभागाचे अधिकारी पारनेरचे वनपाल अश्विनी सोळुंके, वनरक्षक पल्लवी उंडे यांनी गंभीर दखल घेऊन तलावात पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल लोणी हवेलीचे सरपंच मनीषा कोल्हे, माजी सरपंच डॉ. शंकर कोल्हे, उपसरपंच संजय कोल्हे, डॉ. संजय कोल्हे, उज्वला कोल्हे, अनिल कोल्हे, शिवाजी थोरे, शरद कोल्हे, सुनील दुधाडे ग्रामसेवक, रामदास दुधाडे, विलास दुधाडे, भाऊसाहेब कोल्हे, मच्छिंद्र कोल्हे, विजय दुधाडे यांच्यासह दैनिक प्रभातचे ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा