नुकसानीची भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी

लोणी हवेली (ता. पारनेरः येथील रानडुकरांचा बंदोबस्त करावा, या मागणीचे निवेदन वनपाल अश्‍विनी सोळुंके यांना देताना लहू कोल्हे, दादाभाऊ कोल्हे, संजय कोल्हे व ग्रामस्थ. (छाया : शरद रसाळ)

सुपे – पारनेर तालुक्‍यातील लोणी हवेली परिसरात रानडुकरांचा उपद्रव वाढला असून, शेतातील पिकांचे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यानी वनविभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

चालु वर्षी भिषण दुष्काळी परिस्थिती असून देखिल शेतकरी रात्रीचा दिवस करून शेतातील डाळींब, सिताफळ, कांदा, ज्वारी, जनावरांसारी मका आदी पिकांचे संगोपन करत आहेत. यंदाच्या वर्षी पाऊस अल्प प्रमाणात झाल्याने विहिरींनी तळ गाठला आहे.कुंपनलीकेलाही पाणी उपलब्ध नाही अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी हे पिक जगवण्यासाठी विकत टॅंकरच्या सहाय्याने पाणी दिले मात्र हातातोंडाशी आलेल्या पिकांचे रानडुकरांनी प्रचंड नुकसान केले असून या प्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करून पिकांचे पंचनामे करावेत अशि मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे.

-Ads-

वनपाल अश्‍विनी सोळुंके, वनरक्षक पल्लवी जगताप, सतीश उंडे यांना याबाबत निवेदन देण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, लोणी हवेली परिसरात रानडुकरांनी उच्छाद मांडला असून, हाता-तोंडाशी आलेले पीक हे प्राणी नष्ट करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

या पिकांचा तलाठ्यामार्फत पंचनामा करण्यात यावा. तसेच वन्यप्राणी लोणी हवेली परिसरातील डोंगराळ भागात वास्तव्यास आहेत. मात्र त्यांना पाणी मिळत नसल्याने ते मानवी वस्तीत येऊ लागल्याने मानवी जीवितास धोका होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करुन पानवठ्यांमध्ये त्वरीत पाण्याची व्यवस्था करावी व या प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वनविभागाकडे ग्रामस्थांनी केली आहे.

निवेदनावर माजी सरपंच लहू कोल्हे, शिक्षक नेते दादाभाऊ कोल्हे, प्राध्यापक संजय कोल्हे, बाळासाहेब जाधव, संभाजी थोरे, नीलेश जगताप, सागर हिंगडे, बाजीराव दुधाडे आदींच्या सह्या आहेत.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)