बाबुर्डी शाळेत गोवर, रुबेला लसीकरणास प्रारंभ

सुपा – पारनेर तालुक्‍यातील बाबुर्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडी व रोकडेश्‍वर माध्यमिक विद्यालयात गोवर, रुबेला लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. पारनेर पंचायत समितीचे उपसभापती दिपक पवार यांच्या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला.

बाबुर्डीचे सरपंच सुभाषराव दिवटे, रुईछत्रपती प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्याधिकारी डॉ. चोपडे, पारनेर पंचायत समितीचे निरीक्षक तोडमल, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण दिवटे, सदस्या नंदाताई गाडगे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव दिवटे, सुरेश दिवटे, शिक्षक, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

-Ads-

यावेळी डॉ. चोपडे यांनी गोवर-रुबेला लसीकरणाबाबत माहिती सांगितली. उपसभापती दीपक पवार, सरपंच सुभाषराव दिवटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्‍वासन दिले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक राजेंद्र ठुबे यांनी केले, तर आभार कचरू काळे यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)