कृषीगंगा प्रदर्शनास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सुपे – पारनेर येथे 22 नोव्हेंबरला पद्मभूषण अण्णा हाजारे यांच्या हस्ते या राज्यस्तरिय कृषी प्रदर्शनास प्रारंभ करण्यात आला. प्रदर्शनात मागील चार दिवसात किमान दोन कोटी रुपयाची उलाढाल झाली आहे. किमान दीड लाख शेतकरी बांधवांनी या प्रदर्शनास भेट दिली.

या प्रदर्शनात स्टॉलच्या माध्यमातून अनेक शेती उपयोगी उपकरणे, औषधे, बी -बियाणे, गृहोपयोगी वस्तू, शेततळ्याचे कागद, ट्रॅक्‍टर, दूध काढणी यंत्र, खाऊ गल्ली व प्रदर्शनाचे विशेष आकर्षण म्हणजे देशातील सर्वात छोटी आंबू गाय व प्रतिष्ठाणचे सुनियोजीत व्यवस्थापन या सर्वच गोष्टी या कृषी प्रदर्शनात विशेष ठरल्या.

रविवारी प्रदर्शनाच्या अखेरच्या दिवशी पारनेर तालुक्‍यातील कुरुंदचे शेतकरी बांधव नामदेव भोसले यांनी घेतलेल्या फोर्स कंपनीच्या ट्रॅक्‍टरचे वितरण तसेच वनकुटा येथील सावळेराम पवार यांनी घेतलेल्या बॅटरीवर चालनाऱ्या मोटारसायकलचे वितरण निलेश लंके यांच्या हस्ते ग्राहकांना चावी देत करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे मा. सभापती सुदाम पवार, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापू शिर्के, पारनेर नगर पंचायतचे नगरसेवक नंदकुमार देशमुखसह निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य, शेतकरी बांधव व प्रदर्शनास भेट देणाऱ्या अनेक माता, बंधु-भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)