आठ वर्षानंतर सुरू झाले दूध संकलन

कर्मचारी वेतनासह भरपाईचा प्रश्न मात्र टांगणीला

सुपे – पारनेर तालुका सहकारी दूध संघाने पहिल्याच दिवशी साडेतीन हजार लीटर दुधाचे संकलन करूण चांगले पाऊल टाकले आहे. गेली आठ वर्षापासून तालुका दूध संघ बंद असतानाही आज चांगले संकलन झाल्याने लवकरच दहा हजार लिटर दूध संकलन होईल असे सांगून कर्मचाऱ्यांच्या वेतनाचाही प्रश्न लवकरच सामोपचाराने मार्गी लावला जाईल, असे प्रतिपादन संघाचे अध्य़क्ष राहुल शिंदे यांनी कले.

या वेळी संचालक रामचंद्र मांडगे, उपाध्यक्ष संतोष गांगड, दादाभाऊ वारे, विनायक पवार, वसंत सालके, शिवाजी खिलारी, अविनाश खंदारे, व्यवस्थापक डी.बी. गट आदींसह अनेक दूध संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पारनेर संघाला जिल्हा संघाच्या सामाईक जागेतील हिस्सापोटी पाच कोटी सात लाख रूपये मिळणार आहेत, त्यापैकी पाच कोटी चार लाख रूपये मिळाले आहेत. कर्मचाऱ्यांचे नुकसान केले जाणार नाही, त्यांना योग्य ती भरपाई देण्यात येईल. असेही ते म्हणाले.

या सभेनंतर कर्मचारी व संचालक मंडळाची एकत्र बैठक झाली, मात्र या बैठकित कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत व नुकसानभरपाईबाबत निर्णय होऊ शकला नाही. कर्मचाऱ्यांनी आम्हाला संघ बंद झाल्यापासून आजअखेर वेतनाच्या 60 टक्के व येथून पुढे सेवानिवृत्तीपर्यंत 30 टक्के वेतन द्यावा, अशी मागणी केली मात्र, ही मागणी संचालक मंडळाने अमान्य केली. या निर्णयासाठी पुन्हा बैठक घेण्याचे ठरले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)