महावितरणच्या विरोधात रास्ता रोकोचा इशारा

सुपे – पारनेर तालुक्‍यात महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. वारंवार मागणी करूनदेखील जळालेले रोहित्र व डिपी शेजारी डिपीचे स्ट्रक्‍चर 85 ठिकाणी उभ्या असतांना एकाही ठिकाणी अद्याप डिपी बसवली गेली नाही. वारंवार मागणी करुनही संबंधीत अधिकारी परिस्थितीचे गांभीर्य घेत नसल्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत याबाबत कार्यवाही न झाल्यास उद्या (ता.19) नगर- पुणे महामार्गावर नारायणगव्हाण येथे सकाळी 10 वाजता शेतकरी बांधवांच्यावतीने रास्ता रोको करणार असल्याचा इशारा भाजपाचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे यांनी दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पारनेर तालुक्‍यामध्ये कुकडीचे आवर्तन सुरू असतानाही शेतमालाला पाणी देण्यास अडथळे निर्माण होत आहे. तसेच पारनेर तालुक्‍यातील फेल्युअर डिपींची संख्या आणि दुरुस्तीसाठी लागणारा कालावधी या सगळ्यांचा विचार केला तर, फेल्युअर झालेल्या एकूण डिपी आणि त्यांच्यामुळे एकूण सिंचन क्षेत्राचे होणारे नुकसान याचा विचार केला तर, शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणावर होणारे नुकसान हे महावितरणच्या गलथान कारभारामुळे होत आहे.

यासंदर्भात भाजपचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी चीफ इंजिनिअर, नाशिक तसेच महावितरणचे सर्व अधिकारी वर्ग यांच्याकडे अनेक वेळा पाठपुरावा करून ही दुरुस्तीसाठी दिलेली रोहित्रे ही एक ते दीड महिना दुरुस्त करून मिळत नाही. या कालावधीमध्ये होणाऱ्या नुकसानीला केवळ महावितरणचा गलथान कारभार आहे. अशा परिस्थितीमध्ये होणाऱ्या नुकसानीमुळे आणि फेल्युअर डिपी न मिळाल्यामुळे जबाबदार म्हणून महावितरणच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा का दाखल करू नयेत असा सवाल उपस्थित करून वारंवार मागणी करुन सुद्धा पारनेर तालुक्‍यात डिपी शेजारी डिपीचे स्ट्रक्‍चर 85 ठिकाणी उभ्या असताना एकाही ठिकाणी अद्याप एकही डिपी बसवण्यात आले नाही.

नादुरुस्त रोहित्र वेळेत न मिळाल्यामुळे शेतकरी सध्या जनरेटर वापरून ताशी 700 रुपये दराने सिंचनासाठी पाणी उपलब्ध करत आहे. खासगीरित्या रोहित्र दुरुस्त करत आहे. अद्यापही काहीही कार्यवाही झालेली नसल्याच्या निषेधार्थ उद्या सकाळी दहा वाजता नगर-पुणे महामार्गावर शेतकरी बांधवांसह रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून फेल्युअर रोहित्र आणि डिपी शेजारी डिपी योजनेतील 85 डिपींची मंजूरी मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचे भाजपा तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे, तालुका सरचिटणीस सुनील थोरात, युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस सागर मैड, काशिनाथ नवले यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)