‘एक गाव एक गणपती’ उपक्रम कडूसमध्ये राबविणार

सुुपे – पारनेर तालुक्‍यातील कडूस एकच गणपती बसविण्याचा निर्णय ग्रामस्थ व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. भैरवनाथ मंदिर येथील बैठकीस सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावात सर्वधर्म समभाव व एकोपा टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते. विठ्ठल, रुक्‍मिणी मंदिरासाठी वीस लाख रुपये खर्च ेयेणार असून त्या कामाची माहिती देण्यात आली.

गावातील अनेक समस्यांवर मात करून एकोपा निर्माण करण्यासाठी “एक गाव एक गणपती’ ही संकल्पना पुढे आली. तिला सर्वांनी मान्यता दिली. ग्रामस्थांच्या वतीने सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)